शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

निंबोली पुनर्वसन गावाला वर्ग २ चे सातबारा वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 23:18 IST

तालुक्यातील पुनर्वसनच्या प्रतीक्षेत असलेल्या निंबोली (शेंडे) या गावाचे पुनर्वसन प्रलंबित होते. सदर गावाचे पुनर्वसन देऊरवाडा मार्गावरील दौलतपूर गावठाणावर करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देअमर काळे उपस्थित : प्रक्रियेला लागले अकरा वर्ष

आॅनलाईन लोकमतआर्वी : तालुक्यातील पुनर्वसनच्या प्रतीक्षेत असलेल्या निंबोली (शेंडे) या गावाचे पुनर्वसन प्रलंबित होते. सदर गावाचे पुनर्वसन देऊरवाडा मार्गावरील दौलतपूर गावठाणावर करण्यात येणार आहे. नवीन जागेचे पट्टे व सातबाराचे वाटप रविवारी आमदार अमर काळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार विजय पवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.आर्वी तालुक्यातील निंबोली (शेंडे) या गावचे पुनर्वसन दौलतपूर येथील गावठाणावर करण्यात आले आहे. पुनर्वसन ठिकाणी गावठाणाच्या पट्ट्यासोबत येथील भुखंडाचे सातबारा देण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली होती. ही मागणी मान्य करीत येथील २०० प्रकल्पग्रस्तांना आ. अमर काळे यांच्या हस्ते सातबारा व पट्ट्याचे वाटप करण्यात आले आहे. मार्च महिण्या अखेरपर्यंत येथील नवीन पुनर्वसनची कामे तातडीने करण्यात येणार असल्याचे याप्रसंगी मान्यवरांनी सांगितले.मार्गदर्शन करताना निम्न वर्धा प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता इरफान शेख यांनी निंबोली पुनर्वसन वसाहतीमधील रहिवाशांना नागरी सुविधा पुरविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शाळा बांधकाम, ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम, गटारांची बांधकामे, पाण्याच्या सुविधेकरिता कुपनलिकांची कामे सुरू आहे. येत्या मार्चपर्यंत ही कामे पुर्ण होतील. प्रकल्पग्रस्तांना योग्य सोयी-सुविधा देण्यात येईल, असे यावेळी त्यांनी सांगितले.कार्यक्रमाला निन्म वर्धा प्रकल्पाचे उपअभियंता शेख, नितीन पवार, माजी जि. प. सदस्य गजानन गावंडे, निंबोली (शेंडे) येथील विलास देशमुख, अनिल काळे, पंकज ढोमणे, जीतेंद्र काळे, दिलीप गिरी, बबन कुमरे, ज्ञानेश्वर खडसे, बंडू धावडे, राहुल सुपळकार, दिलीप शेंडे, अमीत काळे, मिलिंद तरोटकर, किशोर काळे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निम्न वर्धा प्रकल्पाअंतर्गत २१ गावे बाधित झाली त्यापैकी २० गावातील रहिवाशांना पुनर्वसन वसाहतीमधील भुखंडाची पट्टे देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. या प्रक्रियेला ११ वर्ष लागले. अद्यापही भुखंड धारकांना महसूल विभागाने सातबारा दिला नाही. त्यामुळे यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही;पण निबोली(शे.) गावाला दिलासा मिळाला आहे.