शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिन्यात सात घरफोड्या करणारे गजाआड, सोन्या-चांदीसह रोख जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 14:32 IST

चोरट्यांच्या सात जणांच्या या टोळीतील दोन जण सध्या कारागृहात असून ते चोरीच्या गुन्ह्यात ते न्यायालयीन कोठडी भोगत आहेत.

वर्धा : मागील दीड महिन्याच्या काळात वर्धा शहरातील विविध भागातील सात घरांना टार्गेट करून घरातून रोख व मौल्यवान साहित्य चोरून नेणा-या टोळीतील चार जणांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी रोख ३ हजार रुपये, साडे एकवीस ग्रॅम सोन आणि ११० ग्रॅम चांदी जप्त केली आहे.  रामा देवराव देऊळकर (२३), किसना रमेश राऊत (२५), राजू उर्फ काल्या रामा दांडेकर (२६) व मंगेश बाबुलाल गुंजेवार (२४) सर्व रा. बोरगाव (मेघे), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

चोरट्यांच्या सात जणांच्या या टोळीतील दोन जण सध्या कारागृहात असून ते चोरीच्या गुन्ह्यात ते न्यायालयीन कोठडी भोगत आहेत. तर शंक उर्फ शंक्या राऊत हा फरार आहे. याच टोळीतील चोरट्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय शेजारील सुनील उमरे यांच्या घरासह देशोन्नती कार्यालयातही चोरी केली होती. विशेष म्हणजे या टोळीतील दोन सदस्य पूर्वी रेकी करीत तर चोरी करताना तीन जण पाळत ठेवत होते.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनात एएसआय दत्तात्रय ठोंबरे, विवेक लोणकर, बाबाराव बोरकुटे, पोलीस शिपाई राजू वैरागडे, सचिन इंगोले, जगदीश चव्हाण, महादेव सानप, अरविंद घुगे, रितेश गुजर, दिनेश राठोड, गितेश देवघरे, सचिन दिक्षीत, पवन निलेकर, विकास मुंडे, गंगाधर चांभारे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी