शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांत सापडले मेंदूज्वराचे सात रुग्ण; मृत्यू रोखण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 05:00 IST

मागील चार वर्षांत एकाही जपानी एनसेफेलिटिस बाधिताचा मृत्यू झाला नसला, तरी पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांनी दक्ष राहून खबरदारीचे उपाय करणे गरजेचे आहे. जपानी एनसेफेलिटिस हा एक विषाणूजन्य रोग आहे. तो मनुष्यासह प्राण्यांना समानप्रकारे बाधित करतो. जपानी एनसेफेलिटिस हा सामान्य आजार समजला जात असून, तो लसीकरणाद्वारे रोखला जाऊ शकतो. साधारणत: तीन ते सहा वयोगटातील चिमुकले प्रभावित होतात.

ठळक मुद्देडॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावा नागरिकांनी औषधोपचार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाळ्याच्या दिवसांत कीटकजन्य आजार डोके वर काढतात. त्यात जपानी एनसेफेलिटिस (मेंदूज्वर)चाही समावेश आहे. या आजाराची साधी-साधी लक्षणे असून, मागील चार वर्षांत जिल्ह्यात जपानी एनसेफेलिटिसची तब्बल सात रुग्ण सापडल्याची नोंद आरोग्य यंत्रणेतील हिवताप विभागाने घेतली आहे.मागील चार वर्षांत एकाही जपानी एनसेफेलिटिस बाधिताचा मृत्यू झाला नसला, तरी पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांनी दक्ष राहून खबरदारीचे उपाय करणे गरजेचे आहे. जपानी एनसेफेलिटिस हा एक विषाणूजन्य रोग आहे. तो मनुष्यासह प्राण्यांना समानप्रकारे बाधित करतो. जपानी एनसेफेलिटिस हा सामान्य आजार समजला जात असून, तो लसीकरणाद्वारे रोखला जाऊ शकतो. साधारणत: तीन ते सहा वयोगटातील चिमुकले प्रभावित होतात. फ्लेविवियरस जीनच्या व्हायरसमुळे जपानी एनसेफेलिटिस होत असला तरी, तो सामान्यत: डास चावल्यामुळे पसरतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत प्रत्येक नागरिकाने दक्ष राहून आपल्या घराच्या परिसरात कुठे पाणी साचून डासांची उत्पत्ती तर होत नाही ना, याची शहानिशा करणे गरजचेचे आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डेंग्यू, मलेरिया आदी किटकजन्य आजारांसह जपानी एनसेफेलिटिस नागरिकांच्या अडचणीत भर टाकू शकते. त्यामुळे कोराेना विषयक खबरदारी घेतानाच यंदाच्या पावसाळ्यात या आजारांना रोखण्यासाठी आपली जबाबदारी ओळखून नागरिकांना विशेष दक्षता बाळगावी लागणार आहे.

प्राथमिक लक्षणेबहुतेक रुग्णांत कोणतेच लक्षण दिसत नाहीत. असे असले तरी ताप, डोकेदुखी, मरगळलेपणा, पातळ शौच, स्नायूंमध्ये तीव्र वेदना, स्नायूंमध्ये असामान्य कडकडपणा, हालचालींमध्ये अपंगत्व, झटके येणे ही जपानी एनसेफेलिटिसची प्राथमिक लक्षणे असल्याचे सांगण्यात आले.

डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावा नागरिकांनी औषधोपचारजपानी एनसेफेलिटिसचे लक्षणे आढळल्यास बाधित व्यक्तीने कुठलीही हयगय न करता नजीकच्या रुग्णालयात जावून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे क्रमप्राप्त आहे. असे केल्यास जपानी एनसेफेलिटिस मृत्यू टाळण्यास मदत होते, असे सांगण्यात आले.

पावसाळ्याच्या दिवसांत कीटकजन्य आजार डोकेवर काढतात. त्यामुळे सध्याच्या कोविड संकटात प्रत्येक नागरिकाने आपल्या घराच्या आवारात कुठे डासांची उत्पत्ती तर होत नाही ना, याची शहानिशा करावी. शिवाय आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. कोरडा दिवस हा डासांच्या उत्पत्तीला ब्रेक लावण्यासाठीचा प्रभावी उपाय आहे.- डॉ. जयश्री थोटे, जिल्हा हिवताप अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Healthआरोग्य