शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सेवाग्राम हे तीर्थस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 00:12 IST

आम्ही किती सिंथेटिक झालो आहोत, आपले मन रियॅक्ट करीत नाही. परंतु आपण सेवाग्राम येथे आलो असता मन भरुन आलं, मन रियॅक्ट करुन गेले. शतकातील महामानवाचे साधेपणा, सहजपणा,सरळपणा त्यांच्या जीवनातून दिसून आली.

ठळक मुद्देकिरणकुमार : गांधी १५० जयंती कार्यक्रमानिमित्त आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आम्ही किती सिंथेटिक झालो आहोत, आपले मन रियॅक्ट करीत नाही. परंतु आपण सेवाग्राम येथे आलो असता मन भरुन आलं, मन रियॅक्ट करुन गेले. शतकातील महामानवाचे साधेपणा, सहजपणा,सरळपणा त्यांच्या जीवनातून दिसून आली.आम्ही ट्रम्प आणि इमरान खान यांच्या बाबतीत सर्व काही माहिती करुन घेतो. परंतु या महामानवाचे जीवन चरित्र समजून घेत नाही हे दुर्दैव आहे. अहिंसेचा पाठ घेऊन हिंसेवर विजय मिळविला. त्यांचे योगदानाचे मुल्य नाही. गांधी विचार संपूर्ण विश्वाला दिला आहे. सेवाग्राम ही त्यांची कर्मस्थळी असल्याने हे तिर्थक्षेत्र असल्याचे मी मानतो असे प्रतिपादन अभिनेता किरणकुमार यांनी केले.एकता सेवाभावी संस्था, महाराष्ट्रच्यावतीने आयोजीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्य व एकता संस्थेच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्याने अग्निहोत्री इंजिनीअरींग कॉलेज, नागठाणा रोड, सिंदी (मेघे) वर्धा येथील सभागृहात महात्मा गांधी विचार मंथन पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला अभिनेता किरणकुमार मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय महाकाली शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री, होते. एकता सेवा भावी मंच महाराष्ट्रचे अध्यक्ष व फिल्म निर्माते अजमत खान, अभिनेता आफताब खान, मोहन अग्रवाल, ठाणेदार चंद्रकांत मदने, विनय राजे, अनिल नरेडी व प्राचार्य पडघम व्यासपीठावर उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणातून विचार व्यक्त करतांना पं. अग्निहोत्री म्हणाले, प्रत्येकांनी गांधीजींचे  सिध्दांत आत्मसात करुन त्यांच्या विचारानुसार वाटचाल करावी. अनुभव हेच सिद्ध ज्ञान आहे. जो तत्त्व आणि आदर्श सोबत चालतो तोच पुज्यनीय असतो. चांगले कार्य करणाऱ्यांंचाच सत्कार होतो असे ते म्हणाले.प्रास्ताविक अजमत खान यांनी केले संचालन आणि आभार इमरान राही यांनी मानले. यावेळी गडचिरोलीचे अधीक्षक अभियंता राजीव गायकवाड, निवृत्त कार्यकारी अभियंता के. आर. बजाज, माजी पोलीस आयुक्त, चंद्रकांत उदगीरकर, डॉ. प्रदीप कश्यप, डॉ. एम. नारंग, कवियत्री आभा पारगावकर, महेश बुधवानी, भारत राठोड, तुकाराम महाराज मुंढे, प्रकाश महाराज फड, संगीता जामगे, जयश्री देशमुख परभणी, प्रा. रफिक शेख,, डॉ. सुनील कुमार, अमरावती, राजाराम जाधव, उद्धवराव खेडेकर, जालना, किरण वाडिया, हिंगणघाट, डॉ. अनिल बेग, वर्धा व साहिस्ता परवीन अयुब खान, यवतमाळ यांचा शाल श्रीफळ, प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तर जय महाकाली शिक्षण संस्थेतर्फे अभिनेता किरण कुमार यांचा सत्कार संस्थाध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपस्थित अभिनेता किरणकुमार यांनी बापूकुटीला भेट दिली.

टॅग्स :Sewagramसेवाग्रामMahatma Gandhiमहात्मा गांधी