शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
4
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
5
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
6
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
7
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
8
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
9
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
10
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
11
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
12
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
13
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
14
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
15
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
16
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
17
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
18
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
19
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
20
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू

वर्धा-हिंगणघाट मार्गावर खड्ड्यांची मालिका

By admin | Updated: August 5, 2016 02:05 IST

वर्धा ते हिंगणघाट मार्गाची दुरवस्था झाली आहे. हा मार्ग आता प्रवाशांसाठी कर्दनकाळ ठरत आहे.

अपघाताचा धोका : वाहनधारकांना करावी लागते कसरत हिंगणघाट : वर्धा ते हिंगणघाट मार्गाची दुरवस्था झाली आहे. हा मार्ग आता प्रवाशांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. मार्गावरील मोठमोठे खड्डे चुकविताना वाहन धारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. यामुळे वाहन चालक व प्रवासी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. हिंगणघाट ते वर्धा या रस्त्याचे पाच वर्षांपूर्वी नव्याने बांधकाम केले होते. तसेच मागील वर्षी रस्त्याची डागडुजी केली. मात्र या रस्त्याची आता दुरवस्था झाली आहे. रस्ता पूर्णत: खराब झाला असून जागोजागी असलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालविणे कठीण झाले आहे. खड्ड्यांपासून वाहन काढताना अनेकांची तारांबळ उडते. अनेकदा वाहन चालकांना खड्डे चुकविण्याचा प्रयत्नात अपघाताचा धोका असतो. खड्ड्यातून होणारी ही वाहतूक अधिक धोकादायक झाली आहे. हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी आहे. काही भागातील गिट्टी उघडी पडली आहे. पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे पाण्याने भरलेले असतात. खड्ड्याचा अंदाज न आल्याने अपघाताची शक्यता असते. जिल्हा कार्यालयाला जोडणारा हा एकमेव मार्ग आहे. कामानिमित्त शेकडो लोक ये-जा करतात. जीव धोक्यात घालून या रस्त्याने प्रवास करावा लागत असल्याची खंतही व्यक्त होते. यवतमाळ, अमरावतीकडे जाण्यासाठी हिंगणघाटकरांना हाच रस्ता आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर) कोरा-हिंगणघाट मार्ग ठरतो जीवघेणा कोरा : हिंगणघाट ते कोरा मार्गावरील कडजना येथील पुलाचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या मार्गाने होणारी वाहतूक अत्यंत धोकादयक ठरत आहे. रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या पुलाचे उन्हाळ्यातच काम पूर्ण होणे गरजेचे होते. त्याकडे दुर्लक्ष केले. पावसाळ्यापासून रस्त्याची स्थिती दयनीय झाली आहे. त्यामुळे वाहन धारकांना जाम मार्गे जवे लागत आहे. येथून वाहन काढताना चिखलात वाहन रुतत असल्याने वाहन धारकांना नाहक मनस्ताप होतो. शिवाय अपघाताचा धोका असतो. या मार्गावर जडवाहन फसण्याचा धोका आहे. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागतात. याला जबाबदार असलेल्या घटकांवर कार्यवाहीची मागणी होत आहे. पुलाचे व रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी आहे.(वार्ताहर)