शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

भूकंपसदृश सौम्य धक्क्यामुळे वर्धा जिल्ह्यातील कानगावात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 16:57 IST

लॉकडाऊनमुळे सर्वच नागरिक घरात आहेत. अशातच बुधवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास हिंगणघाट तालुक्यातील कानगाव येथे अचानक जमीन सौम्य प्रमाणात हादरली. यामुळे ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देकारणांचा शोध घेणे सुरूतहसीलदारांनी घेतली नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: लॉकडाऊनमुळे सर्वच नागरिक घरात आहेत. अशातच बुधवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास हिंगणघाट तालुक्यातील कानगाव येथे अचानक जमीन सौम्य प्रमाणात हादरली. यामुळे ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेची नोंद हिंगणघाटच्या तहसीलदारांनी घेतली असून सदर प्रकार नेमका काय याच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.कोरानाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. शिवाय विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण  नागरिक घरात थांबून कोरोनाशी लढा देणाऱ्या यंत्रणेला सहकार्य करीत आहेत. बुधवारी कानगावातील सर्व नागरिक घरात असताना दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास जोराचा आवाज होत जमीन हादरली. या हादऱ्यांमुळे घरातील वस्तू जमिनीवर पडल्या. यामुळे कानगाववासियांमध्ये एकच खळबळ उडाली होती. जमीन हादरल्याने अनेकांनी झटप घराबाहेर पळ काढला. दरम्यान काही व्यक्तींनी याची माहिती तलाठी संजू अंबादे यांना दिली. त्यानंतर त्यांनी ही माहिती तहसीलदार श्रीराम मुंदडा यांना दिली. माहिती मिळताच तहसीलदारांनी सदर प्रकार नेमका काय याची शहानिशा करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.कानगाव हे १ हजार २०० कुटुंबीयांचे गाव आहे. येथील लोकसंख्या ५ हजारांच्या घरात आहे. आज दुपारी जमीन हादरल्याची माहिती मिळताच आपण ही माहिती तहसीलदारांना दिली. हा प्रकार नेमका काय हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.- संजू अंबादे, तलाठी कानगाव.कानगाव, कोसुरला, मोझरी, भिवापूर परिसरात मोठा आवाज होऊन भूकंप सदृश्य हादरे बसल्याची तेथील गावकऱ्यांसह तलाठ्यांकडून माहिती मिळाली आहे. ती माहिती जिल्हाधिकारी वर्धा कार्यालयाला आपण दिली असून  याची शहानिशा होईल.- श्रीराम मुंदडा, तहसीलदार, हिंगणघाट.

टॅग्स :Earthquakeभूकंप