शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सेना-भाजपने शेती व्यवस्था उद्ध्वस्त केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 06:00 IST

शरद पवार म्हणाले, विद्यमान केंद्र व राज्य सरकार हे शेतकरी व कामगारविरोधी असून उद्योगपतींचे कोटी रुपयांचे कर्ज माफ करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे. देशातील ७० टक्के लोक हे शेती करतात. त्यांचा विचार न करता केवळ मूठभर उद्योगपतींच्या भल्यासाठी हे सरकार काम करीत आहे.

ठळक मुद्देशरद पवार : उद्योगपतीधार्जिणे सरकार उलथवून टाका

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : राज्यातील शेती अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालेली असून औद्योगिकरणही पूर्णत: बंद पडलेल्या अवस्थेत आहे. आज बेरोजगारांच्या हाताला काम नाही, येणारी तरुणपिढी ही कामाअभावी भरकटली जाणार आहे. विकासाच्या नावावर सर्वत्र अनागोंदी कारभार सुरू आहे, सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम शासनाचे आहे;परंतु आज सरकार नावाची यंत्रणा ही उद्योगपतींची वेठबिगार झाली आहे, देशात जेथे भाजपचे राज्य आहे, त्याठिकाणी गुन्हेगारी वाढली आहे, स्त्रियांवरील अत्याचारात वाढ झाली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्र्र पवार यांनी गुरुवारी येथे केला. हिंगणघाट विधानसभा मतदार क्षेत्रात गोकुलधाम मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार प्रा. राजू तिमांडे, राकाँचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, माजी आमदार वसंत बोंडे, किशोर माथनकर, दिवाकर गमे, संतोषराव तिमांडे, काँग्रेसचे माधव घुसे, पंढरी कापसे, श्रावण ढगे, राजेंद्र डागा, सुरेखा ठाकरे, वर्षा निकम उपस्थित होते.शरद पवार म्हणाले, विद्यमान केंद्र व राज्य सरकार हे शेतकरी व कामगारविरोधी असून उद्योगपतींचे कोटी रुपयांचे कर्ज माफ करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे. देशातील ७० टक्के लोक हे शेती करतात. त्यांचा विचार न करता केवळ मूठभर उद्योगपतींच्या भल्यासाठी हे सरकार काम करीत आहे. आज मुंबईसारख्या महानगरातील गिरणी उद्योग बंद करून त्याठिकाणी चाळीस मजली इमारती उभ्या होत आहेत. हेच षड्यंत्र हिंगणघाटसारख्या शहरातही राबविण्यात येणार आहे. हे चित्र अतिशय विदारक आहे. राज्य तुमच्या हातात दिले; परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील एकाही गावाचा रस्ता ठिक नाही. सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य आहे. आज खड्डेयुक्त महाराष्ट्राची ओळख होत आहे, ही स्थिती बदलण्याची आज आहे. लोकांचे आर्थिक जीवनमान सुधारायचे आहे त्यासाठी कारखानदारी नव्याने सुरू करून शेतीला पुनर्जीवित करण्याची गरज आहे, तरच तरुण पिढीचे भविष्य उज्ज्वल होईल. महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या; परंतु त्याविषयी कोणती उपाययोजना करायला सरकारला वेळ नाही, केवळ आपल्या विरोधकांना संपविण्यासाठी त्यांच्यावर खोट्या केसेस टाकून गुन्हे नोंदविण्याचे काम हे सरकार करीत आहे, असे ते म्हणाले.सभेचे संचालन राजेश शेंडे यांनी केले. प्रास्ताविक शेषकुमार येरलेकर यांनी केले.

टॅग्स :wardha-acवर्धाSharad Pawarशरद पवार