शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

चाऱ्याअभावी गोधन काढले विकायला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:00 IST

आता ग्रामीण भागातही गुरे चारण्याकरिता गुराखी मिळत नाही. परिणामी, गोपालक तथा शेतकरी हतबल झाले आहेत.

ठळक मुद्देशेतकरी विवंचनेत : गुरे सोडली मोकाट

ऑनलाईन लोकमतचिकणी (जामणी) : आता ग्रामीण भागातही गुरे चारण्याकरिता गुराखी मिळत नाही. परिणामी, गोपालक तथा शेतकरी हतबल झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी गायी, म्हशी, बकºया आदी गोधन विक्रीस काढल्याचे दिसून येत आहे.शेतीला जोडधंदा म्हणून जनावरे पाळली जातात. दुग्ध व्यवसाय उत्तम धंदा आहे. शेतकºयांचे शेती, दूध असे समीकरण समजले जात होते; पण कालांतराने जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते. गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पडिक जमिनी कमी झाल्यामुळे गुरे चारायची कुठे, असा प्रश्न गुराख्यांसमोर निर्माण झाला आहे. शिवाय शहरांसह ग्रामीण भागातील चराई क्षेत्रसुद्धा कमालीचे घटले आहे. यामुळे गुरे चारण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाळीव गुरांपासून शेतीला उपयुक्त ठरणारे शेणखत मिळते. दूध, शेणखतामुळे उत्पन्न अधिक होत होते. यासाठी गायी, म्हशी तसेच बकऱ्या आदी गुरे पाळली जात होती; पण सध्या महागाईच्या काळात गायी, म्हशी व बकऱ्यांची रखवाली देणे न परवडणारी बाब ठरत आहे. गाय, बकरीसाठी मासिक २०० रुपये तर म्हशींसाठी २५० रूपये द्यावे लागतात. एवढी रक्कम देऊनही गुराखी मिळत नसल्याची खंत शेतकरी, गोपालकांकडून व्यक्त केली जाते. जामणी येथे गुरे चारण्याकरिता पुलगाव दारूगोळा भांडाराची पडिक जमीन होती; पण यावर्षी नव्यानेच सदर पडिक जमिनीला कुंपण घालण्यात आले आहे. यामुळे गुरे चारण्याकरिता पडिक शेतजमीनच राहिलेली नाही. यामुळे जामणी येथील गोपालक तथा शेतकरी गुरे विकत असल्याचे दिसून येत आहे.चाराही महागगुरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करतानाही आता शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागते. शेतातील कुटार खाण्यायोग्य राहिले नाही. यामुळेही गुरे पाळणे कमी होत आहे.