वर्धा- सुट्टीचा आनंद साजरा करण्याकरिता बोर धरण येथे आलेल्या नागपूर येथील युवकांपैकी दोघांना जलसमाधी मिळाली. ही घटना रविवारी दुपारी घडली. पंकज गायकवाड आणि निखिल कालबांडे अशी मृतकाची नावे असल्याची माहिती आहे. नागपूर येथील काही युवक बोर धरण येथे फिरायला आले. धरणाच्या भिंतीवर उभे राहून सेल्फी काढण्याच्या नादात त्यांचा तोल गेल्याने ते पाण्यात पडल्याचे प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले. धरणात पाणी असल्याने दोघांचे मृतदेह अद्याप सापडले नाहीत. पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.
सेल्फीचा नाद भोवला; बोर धरणात दोघांचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 21:35 IST