शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीकरिता ‘रोपे आपल्या दारी’ उपक्रम

By admin | Updated: June 24, 2017 00:54 IST

शहरीकरणाच्या सपाट्यात झाडाची संख्या रोडावत असून त्याचा वातावरणावरही परिणाम होत आहे.

११ दिवसीय कार्यक्रम : वनविभागाने टाकले एक पाऊल पुढे लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शहरीकरणाच्या सपाट्यात झाडाची संख्या रोडावत असून त्याचा वातावरणावरही परिणाम होत आहे. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व ओळखून वनविभागाने एक पाऊल पुढे टाकत ‘रोपे आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. २५ जून ते ५ जुलै दरम्यान हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे वनविभागाच्यावतीने सांगण्यात आले. शासनाचे विविध विभाग व जनतेच्या सहभागातून २०१६ मध्ये पावसाळ्यात वनमहोत्सव कालावधीत एकाच दिवसीय उपक्रम राबवून २ कोटी ८१ लाख वृक्ष लावले होते. तर २०१७ मध्ये ४ कोटी वृक्ष लागवड, २०१८ मध्ये १३ कोटी व २०१९ मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवड याप्रमाणे ५० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. या अंतर्गत जिल्ह्यात वनविभागासाठी ३ लाख ७८ हजार, सामाजिक वनीकरण १ लाख २५ हजार, ग्राम पंचायतीकरिता १ लाख १० हजार व स्वयंसेवी संस्था ३९ हजार असे ९ लाख २ हजार रोपे लागवडीचे उदिष्ट देण्यात आले आहे. १ ते ७ जुलै दरम्यान विशेष मोहीम राबवून हा उपक्रम यशस्वी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी व कारंजा या पाच ठिकाणी रोपे पुरविण्याकरिता वनविभागाकडून वनमहोत्सव केंद्र सुरू करण्यात आली आहेत. सदर ठिकाणी वृक्ष मित्राची सुद्धा निवड करण्यात आली आहे. वनमहोत्सव केंद्रावरील रोपे नागरिकांना रोपे आपल्या दारी कार्यक्रमादरम्यान प्रत्येक घराकरिता जास्तीत जास्त ५ व प्रत्येक गृहनिर्माण संस्था इतर संस्था जास्तीत जास्त २५ रोपे शासनाकडून वनमहोत्सव कालावधीत ठरविलेल्या सवलतीच्या दरानुसार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत रोपांचा पुरवठा वनमहोत्सव केंद्रात रोपे शिल्लक असे पर्यंत केला जाणार आहे. प्रथम येणाऱ्यांना प्रधान्यक्रम देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. वनमहोत्सवादरम्यान रोपे प्राप्त करण्याकरिता वर्धा शहरात आर्वी नाका वन कर्मचारी भास्कर इंगळे, वृक्षमित्र अजिक्य काळे, शिवाजी चौकात अरुण कांडलकर, अभिषेक गुजर, बस स्थानकाजवळ विलास पोहेकर, सुमीत जैन, हिंगणघाट नंदोरी चौकात भोवते, न्यायालयासमोर कोपुलवार, आर्वी वनक्षेत्र कार्यालयात वानखेडे, अर्थव मोहदेकर, शेळके, आकाश ठाकरे, कारंजा बस स्थानकासमोर ज्योती लंगडे, वृक्षमित्र संजय तांडेकर यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन उप वनसंरक्षक दिगांबर पगार केले आहे. वृक्षसंवर्धन व वृक्षारोपण ही काळाची गरज असून वनविभागाच्या उपक्रमात मोठ्या संख्येने वयोवृद्धसह तरुण-तरुणी तसेच विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहनही उप वनसंरक्षक पगार यांनी केले आहे.