शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

सिंदीत स्वाईन फ्लूूचा दुसरा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 23:59 IST

शहरात मागील एक महिन्यापासून स्वाईन फ्लूच्या आजाराने थैमान घातले आहे. परंतु, उपाययोजना करण्याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची ओरड आहे. अशातच स्वाईन फ्लूच्या आजाराची लागण होऊन आणखी एकाचा बळी गेल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देशहरात भीतीचे वातावरण । पालिका प्रशासनासह आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदी (रेल्वे): शहरात मागील एक महिन्यापासून स्वाईन फ्लूच्या आजाराने थैमान घातले आहे. परंतु, उपाययोजना करण्याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची ओरड आहे. अशातच स्वाईन फ्लूच्या आजाराची लागण होऊन आणखी एकाचा बळी गेल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बबलू जगदेव असे मृतकाचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, स्थानिक वॉर्ड क्र. ३ मधील सुनील महादेव कळमकर (५०) यांचा यापूर्वी स्वाईन फ्लूच्या च्या आजाराने मृत्यू झाला आहे. परंतु, प्रभावी उपाययोजना करण्याकडे न.प.प्रशासनासह आरोग्य विभाग दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानत आहे. स्वाईन फ्लूने शहरात दुसरा बळी घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील मोठी मशिदीजवळ राहणाऱ्या बबलू जगदेव यांना प्रकृती बिघडल्याने नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बबलूच्या कुटुंबीयांना सांगितले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.शहरात अस्वच्छतेने कळस गाठला असून स्थानिक नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानतच असल्याचे दिसून येते. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे कायम असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आरोग्य विभागासह न.प. प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लू