शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेत निलंबित बीटीची ४,६१५ पाकिटे सील

By admin | Updated: May 22, 2017 01:45 IST

खरीपाचा हंगाम तोंडावर आला आहे. यात अनेक बनावट बियाणे आणि खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची

शेतकऱ्यांना सावधानीचा इशारा : गत हंगामात बनावटीच्या प्रकारातून ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : खरीपाचा हंगाम तोंडावर आला आहे. यात अनेक बनावट बियाणे आणि खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची प्रकरणे आहेत. यात कृषी संचालकांनी नुकतेच निलंबित केलेली बीटी बियाणे बाजारात असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. यावरून कृषी विभागाने निलंबित केलेल्या ‘राशी ६५९’ या वाणाची बीटी बियाणे सील केली आहे. या कंपनीने कृषी संचालकांच्या कारवाई विरोधात वरिष्ठाकडे धाव घेतली आहे. यावर निर्णय होईपर्यंत या बियाण्यांच्या विक्रीवर बंदी असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात बीटी बियाण्यांच्या नावावर शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणे आहे. गत हंगामात कारंजा येथे बोगस कापूस बियाणे विक्री आणि साठवणूक प्रकरणी चंद्रशेखर फरकाडे याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. तसेच बोगस रासायनिक खत साठवणूक केल्याप्रकरणी हिंंगणघाट तालुक्यातील सास्ताबाद येथील सुभाष चौधरी व मंगेश चौधरी तसेच गुजरात येथील अश्विन पटेल या तिघांचर गुन्हा दाखल केला होता. तर बोगस किटकनाशक विक्री प्रकरणी वर्धेतील रामचंद्र मोहरकर नामक व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला होता. खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर तक्रार करताच पोलीस कारवाई झाल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. यंदा पावसाळा लवकर असल्याचे वेधशाळेने जाहीर केले आहे. शेतकरी आपल्या कामात व्यस्त झाला आहे. यामुळे लवकरच बळीराजाकडून बी-बियाणे व खतांच्या खरेदीची लगबग सुरू होणार आहे. त्याची घाई पाहून बाजारात बोगस बियाणे आणि खत विक्री करणाऱ्यांकडून त्याची फसवणूक होण्याची शक्यता आहे. यामुळे कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना सावधान राहण्याचा सल्ला दिला आहे. कोणतेही बियाणे खरेदी करताना त्याची पावती अवश्य घ्यावी अशा सूचना आहेत. ९१ कृषी केंद्र संचालकांचे परवाने रद्द ४गत हंगामात बोगस बियाणे, खत व किटकनाशक विक्री प्रकरणी कृषी विभागाच्यावतीने चांगलीच कामगीरी केली. कृषी विभागाच्यावतीने बियाणे, खत व किटकनाशकाची एकूण ४५९ नमुन्यांची तपासणी केली. यात दोषी आढळलेल्या एकूण ९१ कृषीकेंद्र संचालकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. रद्द करण्यात आलेल्या परवाण्यात २९ बियाणे विक्रेते, ३१ खत विक्रेते आणि ३१ किटकनाशक विक्रेत्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त दोन बियाणे विक्रेत्यांचा परवाना कायमस्वरूपी निलंबित करण्यात आला आहे. तर ंिबयाणे, खत आणि किटकनाशकाची प्रत्येकी एक अशी तीन प्रकरणे पोलिसांत दाखल करण्यात आली आहेत. ३५ व्यावसायिकांना विक्रीबंदचे आदेश ४कृषी विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत जिल्ह्यतील एकूण ३५ व्यावसायिकांना विक्रीबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. यात २९ बियाणे विक्रेते, चार खत दोन किटकनाशक विक्रेत्यांचा समावेश आहे. कृषी संचालकांच्या आदेशावरून बीटीचे ‘राशी ६५९’ हे वाण जप्त करण्यात आले आहे. - संजय बमनोटे, सहायक जिल्हा कृषी अधिकारी, जि.प. वर्धा