शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे वसाहतीत डेंग्यूचा कहर; शंभरावर आढळले सदृश रुग्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 05:00 IST

रेल्वे विभाग हा केंद्र सरकारच्या अख्त्यारित येतो. त्यामुळे रेल्वे वसाहतीच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारीही केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येते; मात्र वर्धा रेल्वे स्थानक परिसराच्या बाजूला असलेल्या रेल्वे वसाहतीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. वसाहत परिसरात असलेल्या उद्यानाची अत्यंत खस्ता हालत झाली असून, गाजरगवत वाढले आहे. रेल्वे इन्स्टीट्यूटचीदेखील खराब अवस्था झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनापाठोपाठ आता डेंग्यू आजाराने डोके वर काढले आहे. अशातच रेल्वे वसाहतीत मात्र कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या देखभाल दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असून, साधी फवारणी देखील केल्या जात नसल्याने रेल्वे वसाहतीत शंभरावर डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आले आहेत. याकडे रेल्वे विभागाने लक्ष देण्याची मागणी वसाहतीतील रहिवासी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. रेल्वे विभाग हा केंद्र सरकारच्या अख्त्यारित येतो. त्यामुळे रेल्वे वसाहतीच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारीही केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येते; मात्र वर्धा रेल्वे स्थानक परिसराच्या बाजूला असलेल्या रेल्वे वसाहतीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. वसाहत परिसरात असलेल्या उद्यानाची अत्यंत खस्ता हालत झाली असून, गाजरगवत वाढले आहे. रेल्वे इन्स्टीट्यूटचीदेखील खराब अवस्था झाली आहे. याची देखभाल दुरुस्ती करण्याकडे मात्र कुणीही दखल घेत नसल्याचा आरोप वसाहतीतील कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.सध्या डेंग्यू या जीवघेण्या आजाराने कहर केला आहे. रेल्वे वसाहतीत सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, यामुळे वसाहतीतील अनेकांना डेंग्यूची लागण झाली आहे. विशेष म्हणजे याची कुठेही नोंद घेण्यात येत नसल्याने नेमका हा आकडा किती, हे समजायला मार्ग नाही. यासंदर्भात रेल्वे विभागाच्या आरोग्य निरीक्षक साठोने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

काही दिवसांपूर्वी डेंग्यूने घेतला युवकाचा जीव काही दिवसांपूर्वी रेल्वे वसाहतीतील रहिवासी कर्मचाऱ्याच्या १६ वर्षीय मुलाला डेंग्यूने ग्रासले होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्या विंगमध्ये अनेकांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती आहे. हे झाल्यानंतर तेथील देखभाल व दुरुस्ती विभागाला जाग आली आणि त्यानंतर फवारणी करण्यास सुरुवात झाल्याचीही माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिली.

निवासस्थाने जीर्ण, मेंटेनन्सकडे दुर्लक्ष रेल्वे वसाहतीतील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. काही निवासस्थाने जीर्ण झाली असून, स्लॅबला तडेदेखील गेलेले आहेत; मात्र ना पेंटींग, ना देखभाल, ना दुरुस्ती होत असल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. याकडेही संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

 

टॅग्स :dengueडेंग्यू