शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

कारंजा शहरात डेंग्यूचा कहर; नऊशेवर रुग्णसंख्या असण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 05:00 IST

शहरांमध्ये ९०० च्या वर डेंग्यूसदृश रुग्ण असल्याचे सर्वत्र बोलले. शहरातील रुग्णालये रुग्णांच्या गर्दीमुळे हाऊफुल्ल झाले असताना, तालुका आरोग्य प्रशासन मात्र हे सत्य स्वीकारायला तयार नाही. तालुका आरोग्य प्रशासनाच्या मते  तालुक्यात भीतीदायक परिस्थिती नसून, खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टर एनएस म्हणजेच नॉन स्पेसिफिक टेस्ट करायला लावतात. ती चाचणीच योग्य नसल्याचे आरोग्य प्रशासनाचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देशहरवासी भयभीत : आरोग्य प्रशासनाच्या लेखी मात्र डेंग्यू नाहीच!

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घाडगे) : शहरामध्येच नव्हे, तर संपूर्ण तालुक्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. नऊशेवर डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आहेत. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. मात्र, आरोग्य विभाग तो डेंग्यू नव्हेच, अशी भूमिका घेऊन हात झटकत आहे.शहरांमध्ये ९०० च्या वर डेंग्यूसदृश रुग्ण असल्याचे सर्वत्र बोलले. शहरातील रुग्णालये रुग्णांच्या गर्दीमुळे हाऊफुल्ल झाले असताना, तालुका आरोग्य प्रशासन मात्र हे सत्य स्वीकारायला तयार नाही. तालुका आरोग्य प्रशासनाच्या मते  तालुक्यात भीतीदायक परिस्थिती नसून, खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टर एनएस म्हणजेच नॉन स्पेसिफिक टेस्ट करायला लावतात. ती चाचणीच योग्य नसल्याचे आरोग्य प्रशासनाचे म्हणणे आहे. मागील पंधरवड्यात खासगी लॅबमध्ये तपासणी करण्याकरिता जाणाऱ्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. संपूर्ण शहरामध्ये एक हजारच्या जवळपास रुग्णसंख्या आहे. यामध्ये लहान व तरुण मुला-मुलींचे प्रमाण अधिक असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य यंत्रणेने याची दखल घेणे गरजेचे असताना यंत्रणा हात वर करीत आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये रक्त तपासणी होत नसून, रक्त नमुना घेतला जातो. तपासणीकरिता शासकीय रुग्णालयात वर्धा येथे अहवाल पाठविला जातो. अहवाल येण्यास तीन-चार दिवस लागतात. त्यामुळे जो रक्त नमुना अहवाल शासकीय रुग्णालयांमधून पाठविला जातो, त्यावरच आरोग्य यंत्रणा विश्वास ठेवत आहे. खासगी लॅबमधील रिपोर्टवर विश्वास ठेवायला तयार नसल्याने गोंधळाची स्थिती आहे.

नगरपंचायतीचे उदासीन धोरण -डेंग्यूच्या थैमानाला नगरपंचायत प्रशासन जबाबदार असून, ठिकठिकाणी नाल्या बुजलेल्या आहेत. डबकीसुद्धा साचलेली आहेत. पंचायत समितीसमोरील भागात मोठ्या प्रमाणात डबकी असतात. मात्र, मोठ्या प्रमाणात कर आकारणी करणारे नगरपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. खुल्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात गवताचे पीक आले असून पावसाचे आणि  सांडपाणी साचलेले असते. - आरोग्य विभाग प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात अपयशी ठरताना दिसून येत आहे.

नगरपंचायत प्रशासनाला धूरळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  मागील १२ दिवसांपासून शहरामध्ये फवारणी सुरू आहे. तसेच हा विषय जिल्हा नियोजन समितीच्या सभेमध्ये पालकमंत्र्यांसमोर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितला. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात केवळ ७५  रुग्ण असल्याचे सांगितले. आमदार रणजित कांबळे यांनी एवढे रुग्ण एका खेड्यात आहेत, असे सांगत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.- नितीन दर्यापूरकर, उपाध्यक्ष, नगरपंचायत, कारंजा. 

सर्व बाबींना नगरपंचायत प्रशासन जबाबदार असून, कुठेही फवारणी करण्यात आली नाही. स्वच्छता होत नाही. त्यामुळेही डेंग्यूने डोके वर काढले आहे. जिल्हा आरोग्य विभागाने शहरामध्ये डेंग्यू तपासणी करण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून जनतेला अधिक भुर्दंड सहन करावा लागणार नाही.- शिरीष भांगे, माजी सरपंच, कारंजा (घा.) 

कारंजा शहरामध्ये कोणतीही भीतीदायक परिस्थिती नसून, खासगी लॅबमध्ये एनएस म्हणजेच नॉन स्पेसिफिक टेस्ट केली जाते. ती पूर्णपणे विश्वासार्ह नसते. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही. -डॉ. सुरेश रंगारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, कारंजा (घा.)

 

टॅग्स :dengueडेंग्यूHealthआरोग्य