शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

शाळांना जाहीर करावे लागणार प्रवेश शुल्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 05:00 IST

२०१८-१९ या शैक्षणिक सत्रातील पैसे शासनाने मंजूर केले आहेत. मात्र, ते शाळांपर्यंत पोहोचविताना निकष लावले जात आहे. शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार ज्या शाळा आपली अ‍ॅडमिशन फी जाहीर करतील, त्यांनाच प्रतिपूर्ती दिली जाणार आहे. शाळांना पहिली ते आठवीसाठी आकारल्या जाणाºया शुल्काचा तपशील शासनाच्या सरल पोर्टल तसेच आरटीई पोर्टेलवर जाहीर करावा लागणार आहे.

ठळक मुद्देसंचालकांचा आदेश : आरटीई प्रवेशाच्या शुल्क प्रतिपूर्तीसाठी नियम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आरटीईच्या राखीव जागांवर मुलांना प्रवेश देणाऱ्या शाळांना शासनाकडून शुल्क प्रतिपूर्ती मिळविण्यासाठी कठोर नियमावली पाळावी लागणार आहे. आता तर अशी प्रतिपूर्ती मिळविण्यासाठी खासगी शाळांना आपली अ‍ॅडमिशन फी आॅनलाईन जाहीर करावी लागणार आहे. आरटीई कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये दोन टक्के जागांवर गरीब विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. नंतर शासन या जागांची शुल्क प्रतिपूर्ती म्हणून शाळांना रक्कम देते. मात्र ही रक्कम देण्यासाठी विलंब होत आहे.२०१८-१९ या शैक्षणिक सत्रातील पैसे शासनाने मंजूर केले आहेत. मात्र, ते शाळांपर्यंत पोहोचविताना निकष लावले जात आहे. शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार ज्या शाळा आपली अ‍ॅडमिशन फी जाहीर करतील, त्यांनाच प्रतिपूर्ती दिली जाणार आहे. शाळांना पहिली ते आठवीसाठी आकारल्या जाणाºया शुल्काचा तपशील शासनाच्या सरल पोर्टल तसेच आरटीई पोर्टेलवर जाहीर करावा लागणार आहे. शाळेकडे आरटीईच्या मान्यतेचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांचे आधारकार्ड सरल प्रणालीत नोंदविणे आवश्यक आहे. सवलतीच्या दरात शाळेचा शासकीय जमिनीचा लाभ मिळालेला नसावा, भाडेतत्त्वावरील शासकीय जमिनीचा लाभ शाळेने घेतलेला नसावा ही सर्व माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी पडताळून पाहिल्यानंतरच शाळांना प्रतिपूर्तीचे पैसे दिले जाणार आहेत.विद्यार्थी शाळेत आहेत की नाही?गेल्या दोन वर्षांत शाळांनी प्रत्येक वर्गासाठी किती प्रवेश शुल्क विद्यार्थ्यांकडून वसूल केले, याबाबतची वर्गनिहाय माहिती शिक्षण संचालनालयाला द्यावी लागणार आहे. शिवाय ज्यावर्षी आरटीईअंतर्गत २५ टक्के जागा भरल्याचा दावा शाळेने केला आहे ते विद्यार्थी आताही त्याच शाळेत शिकत आहेत का, याचीही पडताळणी केली जाणार आहे. या पडताळणीत तथ्य आढळल्यावरच शाळांना प्रवेश शुल्काची प्रतिपूर्ती मिळणार आहे. 

टॅग्स :Schoolशाळा