लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : पुलगाव येथून विद्यार्थी घेऊन जात असलेली स्कूल व्हॅन अनियंत्रित होत उलटली. यात विद्यार्थी जखमी झाले नसून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात विरुळ-रसुलाबाद मार्गावरील हुसेनपूर परिसरात मंगळवारी दुपारी २ वाजता झाला.विरुळ आणि परिसरातील गावांमधील विद्यार्थी पुलगाव येथे शिक्षणासाठी जातात. त्यांची स्कूल व्हॅनद्वारे ने-आण केली जाते. अशीच एक स्कूल व्हॅन विद्यार्थी घेऊन विरुळच्या दिशेने जात होती. वाहन हुसेनपूर शिवारात आले असता वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. दरम्यान वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना वाहन उलटले. मात्र, या अपघातात विद्यार्थी जखमी झाले नसून स्कूल व्हॅनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मातीचे ढीग देताहेत अपघाताला आमंत्रणया मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे आहेत. ते चुकविण्यासाठी वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. शिवाय रस्त्याच्या कडेला मातीचे मोठाले ढिगारे आहेत. हा संपूर्ण प्रकार एखाद्या मोठ्या अपघाताला आमंत्रण देणारा ठरत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने तातडीने योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.
स्कूल व्हॅन उलटली; विद्यार्थी बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 21:40 IST
पुलगाव येथून विद्यार्थी घेऊन जात असलेली स्कूल व्हॅन अनियंत्रित होत उलटली. यात विद्यार्थी जखमी झाले नसून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात विरुळ-रसुलाबाद मार्गावरील हुसेनपूर परिसरात मंगळवारी दुपारी २ वाजता झाला.
स्कूल व्हॅन उलटली; विद्यार्थी बचावले
ठळक मुद्देवाहनाचा चुराडा : हुसेनपूर परिसरातील घटना