शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

स्कूलबस चालकाचा चिमुकलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 05:07 IST

स्कूल बस चालकानेच पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना वणी (लहान) मार्गावर मंगळवारी घडली. याप्रकरणी गुरूवारी केलेल्या तक्रारीवरून अजय ज्ञानेश्वर सोनोने (२४) रा. धामणगाव या नराधम युवकाला पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे पालकांमध्ये असंतोष पसरला आहे.

हिंगणघाट (वर्धा) : स्कूल बस चालकानेच पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना वणी (लहान) मार्गावर मंगळवारी घडली. याप्रकरणी गुरूवारी केलेल्या तक्रारीवरून अजय ज्ञानेश्वर सोनोने (२४) रा. धामणगाव या नराधम युवकाला पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे पालकांमध्ये असंतोष पसरला आहे.पोलीस सूत्रांनुसार, येथून ७ किमी अंतरावरील वणी (लहान) या गावातील पीडित मुलगी स्कूल बसने रोज सकाळी येथील मुक्तांगण या बालवाडीत येते. स्कूल बस क्र. एमएच ३२ क्यू ३३६२ ही वणी, दारोडा व अन्य गावांतील विद्यार्थी घेऊन शाळेत ये-जा करीत होती. दारोडा व अन्य गावातील मुले-मुली आपापल्या घरी सोडल्यावर ही एकटीच मुलगी बसमध्ये राहते. २७ फेबु्रवारी रोजी बसचालक अजय सोनोने याने वणी गावाच्या रस्त्यावर निर्जनस्थळी बस थांबवून तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. घरी गेल्याानंतर आईला संशय आल्याने तिने मुलीला विचारले असता मुलीने बसचालकाने केलेल्या कृत्याबाबत सांगितले. आईवडिलांनी दुसºया दिवशी मुक्तांगणच्या शाळा प्रशासनाला माहिती दिली. प्रशासनाने लगेच पोलिसांना कळविले. पोलीस शिपाई राम इप्पर, उमेश लंडके यांनी त्वरित कारवाई करीत आरोपी अजय सोनोनेला ताब्यात घेतले. आरोपीने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी भादंवि कलम ३७६ तथा पास्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार राजेंद्र शिरतोडे करीत आहेत.>मुलींच्या सुरक्षेचा प्रश्नपालक चिमुकल्यांना स्कूलबस वा आॅटोने शाळेत पाठवितात; पण अशा घटनांमुळे स्कूल बसचालकांवरही पालकांचा विश्वास राहिलेला नाही. मग, मुला-मुलींना शाळेत पाठवायचे कसे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. एकूणच मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :Molestationविनयभंग