शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील साडेसहा हजारांवर विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 05:00 IST

राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २३ मे रोजी घेण्याचे निश्चित केले होते. परंतु दरम्यानच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. राज्यभरात कोरोनाची स्थिती आटोक्यात येताच ८ ऑगस्टला परीक्षा घेण्यास राज्य परीक्षा परिषदेचे मान्यता दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीपरीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाते. यावर्षी सुरुवातीला कोरोनाच्या प्रादुर्भाव तर आता पूर परिस्थितीने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आता १२ ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली असून या परीक्षेकरिता पाचवी आणि आठवीच्या ६ हजार ८३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता शिक्षण विभागही सज्ज आहे. राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २३ मे रोजी घेण्याचे निश्चित केले होते. परंतु दरम्यानच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. राज्यभरात कोरोनाची स्थिती आटोक्यात येताच ८ ऑगस्टला परीक्षा घेण्यास राज्य परीक्षा परिषदेचे मान्यता दिली. परंतु, राज्यातील काही जिल्ह्यामध्ये ८ ऑगस्टला केंद्र शासनामार्फत सेंट्रल पोलीस फोर्स या पदाची लेखी परीक्षा होणार असल्याने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) ९ ऑगस्ट रोजी घेण्याचे निश्चित करून तालुकानिहाय परीक्षेचे तयारी पूर्ण केली.  या परीक्षेचे प्रवेशपत्र २७ जुलैपासून संबंधित शाळांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिले. पण, आता ९ ऑगस्ट हा आदिवासी दिन असल्याने या दिवशी परीक्षा घेऊ नये, अशी मागणी जोर धरू लागली. अशातच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे राज्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीने विद्यार्थ्यांच्या दळणवळणात अडचणी निर्माण होणार असल्याचे काही संघटनांकडून निवेदन प्राप्त झाल्याचे कारण देऊन ही परीक्षा १२ ऑगस्ट घेतली जाईल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना १२ ऑगस्टला होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. या परीक्षेकरिता आधीच निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र ग्राह्य धरले जाणार असल्याचेही राज्य परीक्षा परिषदेने कळविले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना ओळखपत्रानुसारच परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे लागणार.

दोन पाळीत ७४ केंद्रांवर होणार परीक्षाजिल्ह्यातील एक हजार शाळांमधील पाचवी आणि आठवीच्या ६ हजार ८३४ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ७४ परीक्षा केंद्र राहणार असून सकाळी ११.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत आणि दुपारी २.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अशा दोन पाळीमध्ये परीक्षा होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

दहा भरारी पथकाचा राहणार वॉचआठही तालुक्यामध्ये आठ तर जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यांच्या नेतृत्वात दोन पथकांचा वॉच असणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता परीक्षा केंद्रावर सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे. सॅनिटायजरची व्यवस्था करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही, याची दक्षता शिक्षण विभागाने घेतली आहे.

 

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीexamपरीक्षा