शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

वेळापत्रकाच्या अ‍ॅलर्जीने विद्यार्थ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:42 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या उदासिन धोरणामुळे विद्यार्थी, नोकरदार तथा प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील पाचही आगारांतील वेळापत्रक कोलमडले आहे. परिणामी, एकही बस वेळेवर सुटत नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देनोकरदारांचे ‘शेड्यूल’ही प्रभावित : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्या उदासिन धोरणामुळे विद्यार्थी, नोकरदार तथा प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील पाचही आगारांतील वेळापत्रक कोलमडले आहे. परिणामी, एकही बस वेळेवर सुटत नसल्याचे चित्र आहे. परिवहनचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता शहरांतील शाळा, महाविद्यालये गाठताना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचा आधार घ्यावा लागतो. वर्धा हे जिल्हास्थळ असल्याने देवळी, सेलू, खरांगणा (मो.), कानगाव, वायगाव (नि.), रोहणा तथा अन्य ग्रामीण भागातील विद्यार्थी येथे उच्च शिक्षणासाठी येतात. यासाठी त्यांना बसचा प्रवास करावा लागतो. महामंडळाने विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पासेस उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना परिवहनचा प्रवास सोईस्कर पडतो; पण बसेसचे वेळापत्रक पाळले जात नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची बाब समोर येत आहे.पुलगाव, आर्वी, हिंगणघाट, वर्धा व तळेगाव (श्या.पं.), असे जिल्ह्यात पाच आगार आहेत. या आगारांतून सुटणाºया बसेस वेळेवर सोडल्या जात नाहीत. यामुळे जिल्ह्यात कुठेही बसेस वेळेवर पोहोचत नसल्याचे दिसून येते. परिणामी, विद्यार्थी, नोकरदार यांचे ‘शेड्यूल’ प्रभावित होत आहे. नोकरदार व्यक्तींना कार्यालयात तर विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात पोहोचायला वेळ होतो. यात त्यांना नुकसानही सोसावे लागते.परिवहन महामंडळाने वेळापत्रक पाळत वेळेवर बसेस सोडण्याची मागणी कित्येक वर्षांपासून होत आहे; पण परिवहनला वेळापत्रकाची अ‍ॅलर्जी असल्याचेच दिसते. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.सकाळची बस दुपारी तर सायंकाळची बस रात्री उशिराआर्वी - तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाच्या मनमानी कारभारामुळे शैक्षणिक फटका बसत आहे. आर्वी तालुक्यातील गावांतून मोठ्या प्रमाणात प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी शहरात येतात. येथे येण्याकरिता एसटीशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. यातच एसटीचे अधिकारी, कर्मचारी मनमानी कारभार करीत असल्याने शाळा, महाविद्यालयात वेळेवर पोहोचता येत नाही. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते.सकाळी १०.३० वाजता गावात पोहोचणारी बस दुपारपर्यंतही पोहोचत नाही. सायंकाळी ५ वाजताची आर्वी येथून सुटणारी बस रात्री ७ ते ८ वाजेपर्यंत सोडली जात नाही. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचालयाही वेळ होतो आणि परतीचा प्रवास करतानाही ताटकळ होते. रात्री ९ ते १० वाजता विद्यार्थी घरी पोहोचत आहेत. यात विशेषत: मुलींचे पालक ती घरी परतली नाही म्हणून गावातील प्रवासी निवाºयांवर प्रतीक्षा करताना दिसतात. हे चित्र तालुक्यात नित्याचे झाले आहे. अद्याप बस का आली नाही, याबाबत दूरध्वनीवर चौकशी केली असता उद्धट उत्तरे दिली जातात. या सर्व बाबींमुळे विद्यार्थी, विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांमध्ये एसटीबाबत रोष निर्माण झाला आहे. याचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सर्कसपूर येथे सकाळी १०.३० वाजता पोहोचणारी बस आणि सायंकाळी ५ वाजताची बस कधीही वेळेवर येत नाही. निंबोली (शेंडे) येथे तर फारच बिकट परिस्थिती आहे. या गावाला जाण्याकरिता असलेली बस महिन्यातील निम्मे दिवस नादुरुस्त असते. शिवाय आर्वी तालुक्यातील संपूर्ण गावांत अशीच स्थिती आहे. याबाबत सरपंच संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. एसटी आगार आणि एसटी व्यवस्थापन यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने ग्रामीण भगातील बसेस वेळेवर पोहोचत नसल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील बसफेºया वेळेवर न सोडल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सरपंच संघटनेने दिला आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ