शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

सावित्रीबाई स्त्री शिक्षणाचे चालते बोलते विद्यापीठ

By admin | Updated: January 7, 2016 02:50 IST

सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच दीडशे वर्षापूर्वी मुलींसाठी पहिली शाळा सुरू झाली. त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे.

अरूण चौधरी : वर्धा सोशल फोरमतर्फे सावित्रीच्या लेकींचा गौरववर्धा : सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच दीडशे वर्षापूर्वी मुलींसाठी पहिली शाळा सुरू झाली. त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. सावित्रीबाईंनी पुढाकार घेतल्याने स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळाला. त्या स्त्रीशिक्षणाचे चालते बोलते विद्यापीठ आहेत, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अरूण बी. चौधरी यांनी केले.स्थानिक विकास भवनात वर्धा सोशल फोरमच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार मंगळवारी करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून चौधरी बोलत होते. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा, जि. प. च्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती श्यामलता अग्रवाल, महिला व बालविकास अधिकारी मनीषा कुरसंगे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, उपपोलीस अधीक्षक रवींद्र किल्लेकर, वर्धा सोशलन फोरमचे अध्यक्ष अभ्यूदय मेघे, सचिव अविनाश सातव सुधीर पांगूळ यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही विचार व्यक्त केले. सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवल्यानेच आज समाज संतुलित असल्याचे विचार व्यक्त करण्यात आले. यावेळी महर्षी विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रास्ताविक अभ्युदय मेघे यांनी केले. यशस्वीतेसाठी सचिव अविनाश सातव, श्रीकांत राठी, इम्रान राही, प्राचार्य उमेशसिंह सेंगर, अनिल नरेडी, डॉ. श्याम पटवा, प्रशांत इंगळे तिगावकर, सुधाकर मेहरे, शालिग्राम टिबडीवाल, विजय देशपांडे, धनंजय सोनटक्के, संजय तिगावकर, रमेशकुमार केला आदींनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)