शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचाची चलाखी, आमदारांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:08 IST

धानोली (मेघे) येथे जिल्हा नियोजन समिती अंतर्गत आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नाने ग्रामपंचायतीची नवीन इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध झाला. इमारतीच्या लोकार्पण सोहळा पार पडला.

ठळक मुद्देधानोली ग्रा.पं. भवनाचे लोकार्पण : भाजपचे सर्वच पदाधिकारी अनुपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : धानोली (मेघे) येथे जिल्हा नियोजन समिती अंतर्गत आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नाने ग्रामपंचायतीची नवीन इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध झाला. इमारतीच्या लोकार्पण सोहळा पार पडला. मात्र त्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका व कोनशिलेवर आमदार डॉ. पंकज भोयर यांच्यासह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची नावे टाकली व यात सरपंचाने खेळी करीत राष्ट्रवादीचे समीर देशमुख यांचे नाव टाकले. यामुळे आमदारासह भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमावर अघोषित बहिष्कार टाकला.धानोली ग्रामस्थांनी आमदार डॉ. पंकज भोयर यांच्याकडे विविध विकासकामासाठी निधी मागतांना ग्रामपंचायत इमारत जिर्ण झाल्याने नवीन इमारतीसाठी निधी मागितला. आमदारांनी तो उपलब्ध करुन दिला. ग्रामपंचायत निवडणूकीची आचार संहिता लागण्यापूर्वी लोकार्पण करण्यासाठी प्रयत्न करुन मुहूर्त ठरला. उद्घाटक म्हणून आमदार डॉ.पंकज भोयर यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, जि.प. सभापती सोनाली कलोडे, पं.स. सभापती जयश्री खोडे यांच्यासह स्थानिक जि.प.सदस्य व पं.स. सदस्यांची नावे टाकण्यात आली.धानोलीच्या सरपंचाने राष्ट्रवादीचे समीर देशमुख यांचेही प्रमुख उपस्थितीत नाव टाकले.आमदार डॉ. पंकज भोयर यांनी प्रयत्न करुन निधी उपलब्ध करुन दिल्यावर समीर देशमुखांचे नाव टाकल्याने आमदारांनी प्रयत्न करुन उपलब्ध केलेल्या निधीचे श्रेय राष्ट्रवादीचे देशमुख यांना देण्यामागचे राजकारण आमदारांना पटले नाही. लोकार्पण सोहळ्याला आमदारासह निमंत्रण पत्रिकेवरील एकही पदाधिकारी लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहिला नाही.सरपंचाने चुक केली मात्र समीर देशमुखांना ती कशी कळली नाही. अशी खदखद आमदारांना वाटली. देशमुख व भोयर यांच्या राजकीय वैमनस्य आहे हे जगजाहीर असताना आमदाराच्या कार्यक्रमात देशमुख उपस्थित राहणार नाही अशी अटकले बांधले जात असताना समीर देशमुख उपस्थित झाले. यामुळे आमदार व भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला अघोषित बहिष्कार टाकला.समीर देशमुख यांच्या हस्ते व जि.प. सदस्या सुमित्रा मलगाम यांच्या उपस्थितीत लोकर्पण अर्ध्या तासात करुन कार्यक्रमाला गाशा गुंडाळला. सध्या आमदार डॉ. पंकज भोयर सेलू तालुक्यातील प्रत्येक गावाला भेट देऊन विकास निधी उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे पक्षीय राजकारण आणणाºया धानोलीच्या या प्रकाराने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. व धानोलीच्या घटनेचे हसे झाले आहे.

टॅग्स :Pankaj Bhoyarपंकज भोयर