शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचासह पती, मुलगा व सचिव एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:32 IST

नजीकच्या बरबडी येथील महिला सरपंच अनिता रामभाऊ शिवरकर (४४), रामभाऊ बिसन शिवरकर (५१), कैलास रामभाऊ शिवरकर (२३) व तेथील ग्रा.पं. सचिव कैलास पंचमलाल बर्धीया (५०) या चौघांना संगनमत करून २५ हजारांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.

ठळक मुद्दे३५ हजारांची मागणी, २५ हजारांची लाच घेताना अडकले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नजीकच्या बरबडी येथील महिला सरपंच अनिता रामभाऊ शिवरकर (४४), रामभाऊ बिसन शिवरकर (५१), कैलास रामभाऊ शिवरकर (२३) व तेथील ग्रा.पं. सचिव कैलास पंचमलाल बर्धीया (५०) या चौघांना संगनमत करून २५ हजारांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.प्राप्त माहितीनुसार, लाचखोर सरपंच अनिता शिवरकर, रामभाऊ शिवरकर, कैलास शिवरकर व ग्रा.पं. सचिव कैलास बर्धीया या चौघांनी बरबडी ग्रा.पं.च्या हद्दीत कंत्राटदाराच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकास कामाचा २ लाखांचा धनादेश काढण्यासाठी ३२ हजारांच्या लाचेची मागणी केली. तक्रारकर्त्याला लाच देण्याची इच्छा नसल्याने या प्रकरणाची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांना तक्रारकर्त्याने दिली. माहिती प्राप्त होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी सोमवारी सापळा रचून लाचखोर ग्रा.पं. सचिव कैलास बर्धीया याला २५ हजार रुपये स्विकारताना रंगेहात पकडले. तसेच बर्धीया यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे एसीबीच्या अधिकाºयांनी बरबडीच्या महिला सरंपच अनिता शिवरकर, रामभाऊ शिवरकर, कैलास शिवरकर यांना ताब्यात घेतले. सदर चौघांविरुद्ध एसीबीच्या अधिकाºयांनी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दुधलवार यांच्या मार्गदर्शनात एसीबी वर्धाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब गावडे, पीआय ठाकुर, पीएसआय सुहास चौधरी, एएसआय रवींद्र बावनेर, रोशन निंबोळकर, अतूल वैद्य, सागर भोसले, खडसे, वालदे, कुचनकर, हिवाळे आदींनी केली.