शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

बोटींद्वारे रेती उपसा; प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: July 20, 2015 02:11 IST

रेती घाटांचे लिलाव करताना काही अटी लादल्या जातात. शिवाय रेतीमाफीयांवर नियंत्रणासाठी अनेक उपाययोजनाही केल्या जातात; पण त्या निरर्थक ठरत असल्याचेच दिसते.

परवानगीचे केवळ प्रस्तावच : मंत्रालयातून हिरवा कंदील मिळण्यापूर्वीच रेतीची उचलवर्धा : रेती घाटांचे लिलाव करताना काही अटी लादल्या जातात. शिवाय रेतीमाफीयांवर नियंत्रणासाठी अनेक उपाययोजनाही केल्या जातात; पण त्या निरर्थक ठरत असल्याचेच दिसते. नदी पात्रातून बोटींद्वारे रेती काढण्यासाठी मंत्रालयातून परवानगी घ्यावी लागते; पण जिल्ह्यातील घाटधारक केवळ प्रस्ताव पाठवून रेतीचा बोटींद्वारे उपसा सुरू करतात. हा प्रकार जिल्ह्यातील सबंध घाटांवर दिसून येत असताना कारवाई होत नाही, हे वास्तव आहे.आष्टी तालुक्यातील गोदावरी या लिलाव न झालेल्या घाटातून सर्रास रेतीचा उपसा केला जात आहे. जेसीबी, पोकलॅण्डसह बोटींनी रेतीचा उपसा केला जात असल्याचेही समोर आले आहे. असे असले तरी अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. इस्माईलपूर रेती घाटधारक कंत्राटदारच गोदावरी रेती घाटातूनही मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करीत आहे. या प्रकारामुळे नदी पात्र धोक्यात आले आहे. गोदावरी गावाचा विकास साध्य होत नाही, तेथील रस्त्यांची दुरूस्ती होत नाही म्हणून ग्रामस्थांनी रेतीघाटाचा लिलाव करू नये, असा पवित्रा घेतला होता. ग्रा.पं. ने हरकत घेतली होती. यामुळे या घाटाचा लिलाव झाला नाही; पण इस्माईलपूर घाटधारकच गोदावरी घाटातून अतिरेकी रेतीचा उपसा करीत असल्याची तक्रार भाजप पदाधिकारी नानकसिंग बावरी यांनी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्याकडे केली. तत्पूर्वी ग्रामस्थांनीही तक्रारी केल्या; पण कुठलीही कारवाई झाली नाही. एकाच वेळी रेतीचा उपसा करून ठिय्या करायचा व मग रेतीची विल्हेवाट लावायची, असा प्रकार सुरू आहे. याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)नदीपात्रामध्ये वाहतुकीसाठी केला रस्ताआष्टी तालुक्यात नदीपात्र पोखरण्याचेच काम सुरू आहे. लिलावात एक घाट घ्यायचा आणि लगतचे घाटही पोखरून काढायचे, असा प्रकार सर्रास सुरू आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचे चित्र आहे. याबाबत परिसरातील ग्रामस्थ तक्रारी करतात; पण अर्थपूर्ण संबंधांमुळे त्याकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसते. गोदावरी घाटातील रेती उपस्याचाही तसाच प्रकार दिसतो. या घाटातून जेसीबी, पोकलॅण्ड, बोटींसह मजुरांकडूनही रेतीचा अव्याहत उपसा केला जातो. ही रेती ठिय्यावर साठवून नंतर विल्हेवाट लावली जाते. या प्रकारामुळे शासनाला महसुलच मिळत नसल्याचे दिसते. मोबाईल मॅसेज प्रणाली ठरली कुचकामीरेतीच्या अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता मोबाईल मॅसेजची नवीन युक्ती शासनाने शोधून काढली. यात रेती घेऊन निघालेल्या वाहनाच्या चालकाने मोबाईलद्वारे दिलेल्या क्रमांकावर मॅसेज करणे अनिवार्य होते; पण तीन-चार वाहने गेल्यानंतर एक मॅसेज केला जात असल्याचे समोर आले. यामुळे प्रशासन रेती चोरीला आळा घालण्यात अपयशी ठरले आहे. यावर कारवाई हाच पर्याय शिल्लक राहिला आहे.