शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सहा घाटातील वाळूउपशाची मुदत संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 23:29 IST

यावर्षी सुरुवातीला आठ घाटांचा लिलाव होऊन ६ कोटी ७४ लाख ४१ हजार रुपयाचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला. या आठ वाळूघाटांपैकी सहा वाळू घाटांना जुलैपर्यंत वाळूउपशाची परवानगी देण्यात आली होती. आता या सर्व घाटांची मुदत संपली आहे.

ठळक मुद्देघाटधारकांना स्थगितीचा फटका : शासनाकडे पाठविला प्रस्ताव, अवैध उपशाचा जोर कायमच

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यावर्षी सुरुवातीला आठ घाटांचा लिलाव होऊन ६ कोटी ७४ लाख ४१ हजार रुपयाचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला. या आठ वाळूघाटांपैकी सहा वाळू घाटांना जुलैपर्यंत वाळूउपशाची परवानगी देण्यात आली होती. आता या सर्व घाटांची मुदत संपली आहे. पण, लिलावानंतर जवळपास ३७ दिवस न्यायालयाच्या आदेशाने वाळू उपसा बंद ठेवण्यात आल्याने त्याचा फटका घाटधारकांना बसला. यासंदर्भात शासनाला प्रस्ताव पाठविला असून मुदत वाढवून मिळणार का? याकडे लक्ष लागले आहे.पहिल्या टप्प्यात आष्टी तालुक्यातील इस्माईपूर, हिंगणघाट तालुक्यातील सोनेगाव (रिठ), नांदगाव (बोरगाव)-२, पारडी (नगाजी), धोची तर समुद्रपूर तालुक्यातील शिवणी-१, शिवणी-२ व मांडगांव अशा आठ वाळूघाटांचा लिलाव झाला होता. यापैकी इस्माईलपूरचा घाट वगळता सर्वांनीच एप्रिल महिन्यापासून ताबा घेऊन उपसा सुरु केला. त्यामुळे त्यांना जूलैपर्यंतच मुदत देण्यात आली होती. आता या घाटातून वाळू उपस्याची मुदत संपली आहे. इस्माईलपूर घाटधारकाला स्थगितीनंतर मे महिन्यापासून ताबा दिल्याने या घाटाला १२ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. लिलावानंतरच्या तीन महिन्याच्या कालावधीत जवळपास ३७ दिवस वाळूउपशावर स्थगिती दिली होती. त्यामुळे यात घाटधारकांचे नुकसान झाल्याची ओरड होत असल्याने हे दिवस वाढवून देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. परंतु, अद्यापही याबाबत कोणताही विचार झाला नाही. सप्टेंबरनंतर वाळूघाट बंद होत असल्याने काही ठिकाणी मुदत संपल्यावरही अवैध वाळूउपसा सुरूच आहे.दुसऱ्या टप्प्यात आठपैकी दोन घाटांचाच झाला लिलावदुसऱ्या टप्प्यातील प्रक्रियेत आठ घाटांचा लिलाव ठेवण्यात आला होता. यामध्ये पहिल्या टप्प्यात शिल्लक राहिलेल्या नवाबपूर व बिड लाकडी घाटासह देवळी तालुक्यातील हिवरा (कावरे)-१, सोनेगाव (बाई), टाकळी (चनाजी), हिंगणघाट तालुक्यातील घाटसावली, कुरण रिठ व भगवा-२ या घाटांचा समावेश होता. यापैकी हिवरा (कावरे) हा घाट ४२ लाख २३ हजार ५०० रुपयाच्या बोलीत प्रिन्स एंटरप्रायजेसने घेतला आहे. भगवा-२ हा घाट राज ट्रेडर्सने ९ लाख १० हजार ७५० रुपयात घेतला असून त्यांनी अद्याप पैसे भरले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सध्या हिवरा (कावरे)-१ या एकाच घाटाचा मार्ग मोकळा झाला आहे. या घाटातून ३० सप्टेंबरपर्यंतच उपसा करता येणार आहे.धोची घाट बंद करण्याचा प्रस्तावहिंगणघाट तालुक्यातील धोची हा घाट आरपीपी इंन्फ्र ा प्रोजेक्ट कंपनीने तब्बल २ कोटी ३५ लाख ५० हजार रुपयाच्या ऐतिहासिक बोलीत घेतला होता. या घाटातून वाळू उपसाकरण्याकरिता ३० सप्टेंंबरपर्यंत मुदत होती. मात्र वाळू उपसा करण्याचा कंत्राट घेणाऱ्याने गावकऱ्यावर चाकूहल्ला केल्यामुळे या घाटावर कारवाई करुन घाटाची परवानगी रद्द करण्याचा प्रस्ताव तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला. येत्या दोन ते तीन दिवसात ही परवानगी रद्द होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.शिवणी-१ मुदतीपूर्वीच बंदसमुद्रपूर तालुक्यातील शिवणी-१ वाळू घाट ५९ लाख १६ हजार ७०० रुपयात घेतला होता. या घाटातून अवैध उत्खनन होत असल्याची माहिती मिळताच कारवाईकरिता गेलेल्या उपविभागीय अधिकाºयांच्या पथकावर नवरंगे नामक वाळू माफियाने पिस्तुल रोखली होती. त्यामुळे हा घाट बंद करण्यात आला. या एकाच्या चुकीमुळे अनेक भागधारकांना चांगलाच फटका बसला आहे.आष्टी तालुक्यातील ईस्माईलपूर आणि देवळी तालुक्यातील हिवरा (कावरे)-१ या दोनच वाळू घाटातून सप्टेंबरपर्यंत वाळू उपसा करता येणार आहे. बाकी घाटांची मुदत संपली आहे. स्थगितीच्या कालावधीत ३७ दिवस घाट बंद असल्याने त्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.डॉ.इम्रान शेख,जिल्हा खनिकर्म अधिकारी वर्धा

टॅग्स :sandवाळू