शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

तीन टप्प्यात धामची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 23:13 IST

वर्धा जिल्ह्याच्या मध्यातून वाहत असलेल्या धाम नदीचे पात्र झाडे, पाणगवत, विविध प्रकारच्या जलपर्णींमुळे धोक्यात आले आहे. यामुळे तिचे पात्र अरुंद झाले आहे. या पात्राची स्वच्छता करण्याकरिता व जलस्त्रोताचे बळकटीकरण करण्याकरिता या नदीची तीन टप्प्यात स्वच्छता करण्यात येत आहे.

ठळक मुद्देजलस्त्रोताचे बळकटीकरण : नाम फाऊंडेशन व जिल्हा प्रशासनाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा जिल्ह्याच्या मध्यातून वाहत असलेल्या धाम नदीचे पात्र झाडे, पाणगवत, विविध प्रकारच्या जलपर्णींमुळे धोक्यात आले आहे. यामुळे तिचे पात्र अरुंद झाले आहे. या पात्राची स्वच्छता करण्याकरिता व जलस्त्रोताचे बळकटीकरण करण्याकरिता या नदीची तीन टप्प्यात स्वच्छता करण्यात येत आहे. हा उपक्रम नाम फाऊंडेशन आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येत आहे. ही मोहीम उद्या शनिवारपासून सुरू होणार असून त्याला ‘धाम नदी स्वच्छता अभियान’ असे नाव देण्यात आले आहे.या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, नाम फाऊंडेशनचे विदर्भ-खानदेश प्रमुख हरिश इथापे यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करुणा जुईकर, महिला व बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट, जि.प.सदस्य राजश्री राठी यांची उपस्थिती होती.शिवाय याच नदीतून वर्धा शहराला आणि आसपासच्या गावांना पिण्याचे पाणी पुरविण्यात येते. या नदीपात्रात असलेल्या जलपर्णीमुळे पाणी दूषित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, शिवाय नदीचे पात्र अरुंद झाले आहे. या सर्व प्रकारामुळे नदीपात्रात पाणी राहत नसल्याचे समोर आले आहे. ही नदी जिल्हयातील काचनूर ते आंजी(मोठी) त.वर्धा ते येळाकेळी,त.सेलु या भागातून धाम नदी वाहते.या नदीमधुन वर्धा व परिसरातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. नदीपात्रात असलेल्या अस्वच्छतेमुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत अत्यंत कमकुवत झाले आहेत. येत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत आताच दिसत आहे. ही भीषण समस्या, या भागातील लोकांची व लोकप्रतिनिधींची मागणी पाहता जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय आणि नाम फाऊंडेशनच्यावतीने या नदीच्या स्वच्छतेचा निर्णय घेतला आहे. ही स्वच्छता मोहीम उद्यापासून प्रारंभ होणार आहे.या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मेश्राम, कार्यकारी अभियंता नरेश शेनवार, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग काळे, आंजी (मोठी) येथील सरपंच जगदीश संचारिया, सामाजिक कार्यकर्ते अशोक कलोडे, सुनील गफाट प्रामुख्याने उपस्थित होते.नाम फाऊंडेशन आणि लोकसहभागातून मोहीमधाम नदीपात्राच्या स्वच्छतेची मोहीम शासनाच्या सहकार्याने लोकसहभागातून नाम फाऊंडेशन राबविणार आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा पहिला आर्वी तालुक्यातील काचनुर, वर्धा तालुक्यातील आंजी (मोठी) येथे दुसरा टप्पा तर तिसरा टप्पा सेलू तालुक्यातील येळाकेळी येथे राबविण्यात आला.

टॅग्स :riverनदी