लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष सुरेश देशमुख यांचे सुपुत्र समीर देशमुख यांनी मंगळवारी दुपारी २.३० वाजता शिवसेना भवनात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. समीर देशमुख हे राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष होते. बराच काळ वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे अध्यक्ष होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत समीर देशमुख यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघात कॉँग्रेसच्या उमेदवार चारूलता टोकस यांच्या विरोधात जाहीररीत्या प्रचार केला होता. तेव्हापासूनच ते राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला रामराम करतील, अशी शक्यता होती. अखेरीस त्यांनी मंगळवारी पत्नी प्रियांका यांच्यासह शिवबंधन बांधले. प्रवेशाच्यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, विदर्भ समन्वयक अरविंद नेरकर उपस्थित होते.
समीर देशमुख यांचा राष्ट्रवादीला रामराम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 06:00 IST
समीर देशमुख हे राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष होते. बराच काळ वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे अध्यक्ष होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत समीर देशमुख यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघात कॉँग्रेसच्या उमेदवार चारूलता टोकस यांच्या विरोधात जाहीररीत्या प्रचार केला होता.
समीर देशमुख यांचा राष्ट्रवादीला रामराम
ठळक मुद्देउद्धव ठाकरे यांच्या हस्ते बांधले शिवबंधन