शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

१५ वर्षांपूर्वीचे वाहन अन् हत्ती सांभाळणे सारखेच; आठपट शुल्क भरावे लागणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 05:00 IST

१५ वर्षे झालेल्या व अधिकाऱ्यांच्या तपासणीअंती फिटनेस प्रमाणपत्र मिळणाऱ्या वाहनांसाठी आता पूर्वीच्या तुलनेत आठपट शुल्क वाहनमालकास भरावा लागणार आहे. त्यामुळे १५ वर्षांपूर्वीचे वाहन अन् हत्ती सांभाळणे सारखेच होणार असे म्हटल्यास वावगे ठरू नये. १५ वर्षांपेक्षा जुने वाहन असेल तर त्यावर ग्रीन टॅक्सची तरतूद आहे. तर वाहनाची फिटनेस टेस्ट करावी लागेल. तसेच वाहनमालकास हरित कर द्यावा लागेल. पण याच विविध करात आता वाढ करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : संभाव्य वायुप्रदूषणाला ब्रेक लावण्यासाठी केंद्र सरकारकडून नवीन स्क्रॅप पाॅलिसी जाहीर करण्यात आली. त्यानुसार १५ वर्षांपूर्वीची जुनी व खिळखिळी झालेली अनफिट वाहने भंगारात टाकावी लागणार आहे. असे असले तरी १५ वर्षे झालेल्या व अधिकाऱ्यांच्या तपासणीअंती फिटनेस प्रमाणपत्र मिळणाऱ्या वाहनांसाठी आता पूर्वीच्या तुलनेत आठपट शुल्क वाहनमालकास भरावा लागणार आहे. त्यामुळे १५ वर्षांपूर्वीचे वाहन अन् हत्ती सांभाळणे सारखेच होणार असे म्हटल्यास वावगे ठरू नये. १५ वर्षांपेक्षा जुने वाहन असेल तर त्यावर ग्रीन टॅक्सची तरतूद आहे. तर वाहनाची फिटनेस टेस्ट करावी लागेल. तसेच वाहनमालकास हरित कर द्यावा लागेल. पण याच विविध करात आता वाढ करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. 

फिटनेस सर्टिफिकेटही महागणार-    जुन्या वाहनांबाबतच्या केंद्र सरकारच्या नवीन धोरणांमुळे वायुप्रदूषणाला ब्रेक लागणार असला, तरी केंद्राच्या नवीन धोरणांमुळे विविध शुल्कात मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये जुनी, पण सुस्थितीत असलेल्या वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट मिळविण्यासाठी अधिकचा भुर्दंडच वाहनमालकांसह चालकांना सोसावा लागणार आहे.

१५ वर्षे जुने वाहन न ठेवलेलेच बरे-    १५ वर्षे जुन्या वाहनांबाबत केंद्र सरकारकडून वेळोवेळी नवीन नवीन आदेश जाहीर केले जात आहेत. इतकेच नव्हे तर विविध शुल्कातही वाढ करण्यात येत असल्याने १५ वर्षे जुनी वाहने न घेतलेलीच बरी, अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये होत आहे.उपप्रादेशिक परिवहन विभागाला लेखी सूचनांची प्रतीक्षा-    १५ वर्षे जुन्या वाहनांच्या वापराबाबत व विविध शुल्काबाबत केंद्र सरकारकडून काही मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. असे असले तरी त्याबाबतच्या लेखी सूचना अद्यापही वर्धेच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला प्राप्त झालेल्या नसल्याचे सांगण्यात आले.

१५ वर्षे जुन्या व फिट वाहनांना रितसर परवानगी मिळण्यासाठीच्या विविध शुल्कात वाढ होणार असल्याचे आपण वृत्तपत्रात वाचले आहे. असे असले तरी अजून आम्हाला वरिष्ठांकडून कुठल्याही लेखी सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. लेखी सूचना प्राप्त झाल्यावरच आम्हालाही अधिकची माहिती कळणार आहे.- तुषारी बोबडे, प्रभारी सहा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस