शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

राज्यकर्त्यांनी समस्यांचे निराकरण न करता त्यांचा संग्रह केला

By admin | Updated: February 14, 2016 02:02 IST

जनतेच्या हजारो समस्या आहे आणि या समस्यांचे निराकरण करण्याची हमी स्वातंत्र्याचे आंदोलन चालविणाऱ्या नेत्यांनी दिली होती.

वामन मेश्राम : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाचे प्रबोधन संमेलनवर्धा : जनतेच्या हजारो समस्या आहे आणि या समस्यांचे निराकरण करण्याची हमी स्वातंत्र्याचे आंदोलन चालविणाऱ्या नेत्यांनी दिली होती. स्वातंत्र्यानंतर एक विदेशी गेले अन दुसरे विदेशी देशाचे राज्यकर्ते झाले. हे दुसरे विदेशी आमच्या मुलांना दररोज भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचे धडे देतात. राज्यकर्त्यांनी समस्यांचे निराकरण न करता त्यांचा केवळ संग्रह केला आहे, असे मत बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी व्यक्त केले.बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाद्वारे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रबोधन संमेलन घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन डॉ. किरण नागतोडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून हिंदी विद्यापीठाचे प्रा.डॉ. सुनीलकुमार सूमन तर अतिथी म्हणून राष्ट्रीय किसान मोर्चाचे राष्ट्रीय प्रभारी रामसुरेश वर्मा, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे राष्ट्रीय प्रभारी पे्रमकुमार गेडाम, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विदर्भ अध्यक्ष निळकंठ पिसे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मंगेश विधळे, बहुजन मुक्ती पार्टीचे विदर्भ संघटक पाटील, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश मुडे, सुधाकर ठाकरे उपस्थित होते.मेश्राम पूढे म्हणाले की, देशात जे पढे लिखे लोक आहेत, ते प्रत्यक्षात पढे लिखे नसून लिखे पढे लोक आहेत. ब्राह्मणांनी पुस्तक लिहिली व आम्ही घोकली. भारत स्वतंत्र झाल्याचं याचं ब्राह्मणांनी लिहिलं आणि आम्ही मान्य केले. सर्वात मोठी घोडचूक आम्ही स्वतंत्र आहोत, हे मानल्याने झाली. याच बाबीमुळे पुन्हा हजारो समस्या निर्माण झाल्या. पंतप्रधानांबाबत ते म्हणाले की, ओबीसींची जाती आधारित जनगणना न करता मोदी सरकारने याविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करून ओबीसींना उघड-उघड दगा दिला. नरेंद्र मोदी ओबीसी असतील तर जसे शेतकरी पशु-पक्ष्यांपासून सरंक्षण करण्यासाठी पिकांमध्ये बुजगावने उभे करतात, तसे नरेंद्र मोदी हे ओबीसींच्या नावावर भाजपने ठेवलेले बुजगावने आहे. मोदींना निवडून ओबीसींनी स्वत:ची फसगत करून घेतली आहे, असेही त्यांनी सांगितले.तत्पूर्वी हैद्राबाद विद्यापीठ प्रशासनाच्या जातीय छळापायी आत्महत्या केलेल्या रोहित वेमुला या विद्यार्थ्याच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आर्वी नाका ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत रॅली काढण्यात आली. यात बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, भारतीय विद्यार्थी मोर्चा, भारतीय बेरोजगार मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघटना, इंडियन मेडिकल प्रोफेशनल, प्रोफेसर अ‍ॅण्ड टिचर्स, लॉयर्स असो., भारतीय युवा मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी महिला, पत्रकारिता, वारकरी संघ, सत्यशोधक छत्रपती विचार व जागृती मंच आदी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते. यानंतर जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.(कार्यालय प्रतिनिधी)आंबेडकरांचा संघर्ष हा ‘रिअल डेमोक्रेसी’साठी होता१८८५ मध्ये काँग्रेसची स्थापना झाली आणि यावेळी ज्योतिराव फुले जिवंत होते. बहुजन समाजातील सर्वात विद्वान असूनही ते काँग्रेसमध्ये सामील झाले नाही. छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही तथाकथित स्वातंत्र्याच्या आंदोलनात सामिल होण्यास नकार दिला होता. आंबेडकरांचा संघर्ष हा ‘रिअल डेमाके्रसी’साठी होता तर स्वातंत्र्याचे आंदोलन हे ब्राह्मणांच्या स्वातंत्र्याचे आंदोलन होते. कुणाला संशय असेल तर ही बाब मी ब्राह्मण लेखकांच्या ऐतिहासिक दस्ताऐवजावरून सिद्ध करून दाखवितो. जदयूचे खासदार शरद यादव यांनी मागील वर्षी कार्मिक मंत्रालयाकडून मिळविलेली माहिती मला दाखविली. यात ७९.२ टक्के आयआयएस, आयपीएस ब्राह्मण व तत्सम जातीचे असल्याचे दिसून आले. एक आयआयएस, आयपीएस किमान ३० वर्षे राज्य करतो. त्याची केवळ बदली करता येते. ८० टक्के ब्राह्मण व तत्सम जातींचे अधिकारी व केवळ २० टक्के बहुजन अधिकारी असल्याने चेहरा पाहूनच न्याय होतो.सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे ९८ टक्के न्यायाधीश ब्राह्मण व तत्सम जातींचे आहेत. हेच लोक संविधानाची व्याख्या करण्याचे काम करतात. संविधान आमच्या बाजूने असले तरी व्यवस्था त्यांच्या बाजूने आहे. बहुमताच्या जोरावर देश चालविला जात आहे. आजही देशात विधायिका, कार्यपालिका, न्यायपालिका व मिडीया या लोकशाहीच्या चारही स्तंभावर केवळ ब्राह्मणाचंचे वर्चस्व आहे. ही स्थिती बदलायची असेल तर जनआंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे मतही वामन मेश्राम यांनी प्रबोधन संमेलनात व्यक्त केले.