शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
3
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
4
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
5
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
6
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
7
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
8
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
9
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
10
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
11
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
12
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
13
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
14
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
15
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
16
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
17
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
18
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
19
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
20
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला

ग्रामीण भागातील शिक्षण दध्वस्त करणारा निर्णय; २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या वर्गाला विषय शिक्षक मिळणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 17:29 IST

संचमान्येतचा शासन निर्णय : १५१ विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेत मुख्याध्यापद देण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षकांची पदे निश्चित करणाऱ्या २०२४-२५ या वर्षासाठी संचमान्यतेने ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा उद्ध्वस्त करणारा आहे. २० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या उच्च प्राथमिक शाळेतील वर्गाला एकही शिक्षक मिळणार नाही. त्यामुळे १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय रद्द करा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे व शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची भेट घेऊन केली.

१०० विद्यार्थी असल्यास आता स्वतंत्र मुख्याध्यापकइयत्ता सहावी ते आठवीची पटसंख्या ३६ असल्यास ती शिक्षक मान्य असताना त्यातही बदल करून ८६ पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास तीन शिक्षक मान्य करण्यात आले. त्याचप्रमाणे प्राथमिकसाठी ६० विद्यार्थ्यांपर्यंत दोन शिक्षकांची पदे मान्य आहेत. शिक्षण हक्क कायद्यात ६१ विद्यार्थी असल्यास तीन शिक्षक मान्य केले आहे; परंतु सुधारित शासन निर्णयानुसार तिसरा शिक्षक मान्य होण्यासाठी आता ७६ विद्यार्थी आवश्यक आहेत. १ पहिली ते ५ वीची पटसंख्या ९१ असल्यास चार शिक्षक शाळेला मिळतात; परंतु आता १०६ विद्यार्थी असतील तरच चौथा शिक्षक दिला जाणार आहे. १०० विद्यार्थीसाठी शाळेला स्वतंत्र मुख्याध्यापक असतो. 

शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन

  • शिक्षण हक्क कायद्याच्या कलम १९ व २५ नुसार विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षकांची संख्या निश्चित केली आहे.
  • मुळात शिक्षण हक्क कायद्याने प्रत्येक शाळेत कमीत कमी किती शिक्षक असावेत, याचे निकष निश्चित केले; परंतु शिक्षण हक्क कायदा येण्यापूर्वी महाराष्ट्रात २८ ऑगस्ट १९८० च्या शासन निर्णयानुसार शिक्षण हक्क कायद्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात शिक्षक मिळत होते.
  • शिक्षण हक्क कायद्याने किमान शिक्षक संख्या निश्चित केली असताना १९८० चा शासन निर्णय अधिक करून शिक्षक संख्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात कमी करण्यात आली.
  • २८ ऑगस्ट २०१५ शासन निर्णयानुसार शिक्षण हक्क कायद्याला धरून शिक्षकांचे प्रमाण निश्चित करण्यात आले. त्यानुसार इयत्ता सहावी व सातवीमध्ये ७० पेक्षा कमी विद्यार्थी असल्यास दोन शिक्षक, ७१ पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास तीन शिक्षक मंजूर करण्यात आले.
  • इयत्ता सहावी ते आठवीची पटसंख्या ३५ पेक्षा अधिक असल्यास तीन शिक्षक मान्य करण्यात आले; परंतु १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाने शिक्षण हक्क कायद्याने दिलेले शिक्षकसुद्धा काढून घेण्यात आले असून २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या उच्च प्राथमिक शाळेला आता एकही शिक्षक मिळणार नाही, अशा प्रकारची निश्चिती करण्यात आली.

 

टॅग्स :wardha-acवर्धाEducationशिक्षण