शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जादा प्रवासी भाडे घेणाऱ्यांवर आरटीओ करेल धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2021 05:00 IST

दिवाळी सणादरम्यान कुठल्याही प्रवाशाची आर्थिक पिळवणूक होऊ नये या हेतूने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात वर्धा येथील उपप्रादेशिक परिवहन विभाग विशेष वाहन तपासणी मोहीम राबविणार आहे. या मोहिमेदरम्यान खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून कुण्या प्रवाशाकडून शासकीय नियम डावलून जास्तीचे प्रवास भाडे तर घेतल्या गेले नाही ना याची शहानिशा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवाळी तसेच भाऊबीजचे औचित्य साधून अनेक व्यक्ती आपल्या मूळगावी परततात. त्यामुळे या दिवसात मेट्रो सिटीतून येणाऱ्या व मेट्रो सिटीत परतणाऱ्यांची ही संख्या मोठी असते. दिवाळी सणादरम्यान कुठल्याही प्रवाशाची आर्थिक पिळवणूक होऊ नये या हेतूने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात वर्धा येथील उपप्रादेशिक परिवहन विभाग विशेष वाहन तपासणी मोहीम राबविणार आहे. या मोहिमेदरम्यान खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून कुण्या प्रवाशाकडून शासकीय नियम डावलून जास्तीचे प्रवास भाडे तर घेतल्या गेले नाही ना याची शहानिशा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. ही मोहीम जिल्ह्यात यशस्वी राबविण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या दाेन चमू सज्ज करण्यात आल्या आहेत. दोषी आढळणाऱ्या ट्रॅव्हल्स चालक व मालकांवर कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीही सदर मोहीम राबविण्यात आली होती. त्यामुळे त्यावेळी वर्धा जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात  तसेच जिल्ह्याबाहेरून वर्धेत येणाऱ्यांची संभाव्य पिळवणुकीला ब्रेक लागला होता.

तीन निरीक्षकांचा राहणार वॉच-    दिवाळी, भाऊबीज व इंग्रजी नवीन वर्षाच्या औचित्याने प्रवाशांची होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीच्या प्रकाराला ब्रेक लावण्यासाठी वर्धा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या दोन चमू सज्ज करण्यात आल्या आहेत. या दोन चमूत तीन निरीक्षकांचा समावेश राहणार असून त्यांच्याकडून प्रत्येक खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार आहे.

५०० वाहन तपासण्याचा मानस-    दिवाळीनिमित्त उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने मागील वर्षी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष वाहन तपासणी मोहिमेचा प्रवाशांनाही मोठा फायदा झाला होता. शिवाय दिवाळीनिमित्त होणाऱ्या पिळवणुकीच्या प्रकाराला ब्रेक लागला होता. तर यंदाही ही मोहीम राबविण्याचे निश्चित करण्यात आले असून यंदा किमान ५०० खासगी प्रवासी वाहनांची तपासणी करण्याचा मानस वर्धा उपप्रादेशिक परिवहन विभागाचा आहे.

मागील वर्षी तपासली ३२८ वाहने-    दिवाळीचे औचित्य साधून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होऊ नये म्हणून मागील वर्षी वर्धा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने ३२८ खासगी प्रवासी वाहनांची तपासणी करण्यात आली होती. तर यंदा ५०० वाहनांची तपासणी करण्याचा मानस आहे.

दिवाळीनिमित्त अनेक व्यक्ती आपल्या मूळ गावी येतात. याचाच फायदा घेत प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होण्याची शक्यता असते. याच प्रकाराला आळा घालण्यासाठी यंदाही उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून विशेष वाहन तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी दोन चमू सज्ज करण्यात आली आहेत.- तुषारी बोबडे, प्रभारी सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस