आॅनलाईन लोकमतवर्धा : आरटीओ कार्यालयांकडे ट्रॅक नसल्याने काही दिवस वाहन तपासणी, फिटनेस प्रमाणपत्र देणे आदी कामे बंद होती. यात वर्धा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचा समावेश होता. वर्धा आरटीओकडे पिपरी (मेघे) येथे व नंतर एमआयडीसी परिसरात ट्रॅक होता; पण दोन्ही ट्रॅक बंद करावे लागले. परिणामी, पासिंग, फिटनेस प्रमाणपत्र देणे बंद होते. आता सालोड येथे जागा मिळाली; पण रस्ताच नसल्याने ती अडचणीची ठरत आहे.आरटीओ कार्यालयाद्वारे वाहन तपासणी, वाहन चालकांना शिकाऊ परवाना देण्याची प्रक्रिया सालोड (हिरापूर) गावाच्या मागील जागेत सुरू आहे. पण, येथे पोहोचण्याकरिता वाहन चालकांना अनेक अडचणींतून जावे लागते. येथील रस्ता सहज सापडत नाही. जड वाहनांना गावातून प्रवेश नसल्याने वाहन चालकांना मार्ग शोधतानाही त्रास सहन करावा लागतो. आरटीओ कार्यालय वाहनांची तपासणी करीत फिटनेस प्रमाणपत्र देते. यापूर्वी हे काम पिपरी (मेघे) येथील मैदान तथा एमआयडीसी परिसरात केले जात होते. एमआयडीसी परिसरातील रस्ते खराब होत आहेत, असा आक्षेप घेण्यात आल्याने तेथील तपासणी बंद करण्यात आली. दरम्यान, आरटीओद्वारे शासकीय जागेची निवड करण्यात आली. ही जागा सालोड गावाच्या मागील बाजूस आहे. येथे गावातून जावे लागते. दुसरा मार्ग सावंगी ते पालोतीदरम्यान आहे. हा मार्ग कच्चा व किचकट आहे. गावातून जड वाहनांना प्रवेश शक्य नाही. यामुळे वाहने वळसा घालूनच न्यावी लागतात. हा वळसा वाहन धारकांना परवडणारा नाही. यामुळे ट्रॅकचा मार्गच बिकट झाला आहे.हलक्या व जड वाहनांची होते तपासणीसालोड येथील नवीन ट्रॅकवर हलक्या तसेच जड वाहनांची तपासणी केली जाते. यात स्कूल बस, परिवहन महामंडळाच्या बसेस आदी वाहनांचा समावेश आहे. या वाहनांची तपासणी करीत फिटनेस प्रमाणपत्र दिले जाते; पण येथे येताना कष्ट उपसावे लागत असल्याने वाहनधारकांसह सहकाºयांची चांगलीच अडचण होत आहे.अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही अडचणट्रॅक नसल्याने काही दिवस पासिंग, फिटनेस प्रमाणपत्र देणे आदी कामे बंद होती. आता ट्रॅक मिळाला; पण तेथे पोहोचण्याचा मार्ग बिकट असल्यने संबंधित अधिकारी, कर्मचाºयांनाही चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. असे असले तरी सध्या याबाबत कुणी बोलताना दिसत नाही. जागा अडचणीची असली तरी कामे बंद ठेवता येत नसल्याने तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणे सुरू आहे.
आरटीओच्या वाहन तपासणीस्थळाचा मार्ग बिकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 21:59 IST
आरटीओ कार्यालयांकडे ट्रॅक नसल्याने काही दिवस वाहन तपासणी, फिटनेस प्रमाणपत्र देणे आदी कामे बंद होती.
आरटीओच्या वाहन तपासणीस्थळाचा मार्ग बिकट
ठळक मुद्देरस्ता शोधताना दमछाक : जड वाहनांना गावातून प्रवेशबंदी