शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

खऱ्या पे्रमात त्यागाची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 23:20 IST

ज्यांना पे्रमाची खरी व्याख्या कळते, त्यांनाच प्रेम करण्याचा नैतिक अधिकारी असतो. खऱ्या प्रेमामध्ये त्यागाची भूमिका फार मोठी असते. आणि ज्यांना त्याग करायला जमतं त्यांनाच जीवनामध्ये खरं प्रेम लाभते.

ठळक मुद्देप्रकाश घोडके : यशवंत महाविद्यालयात रंगली काव्य मैफील

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ज्यांना पे्रमाची खरी व्याख्या कळते, त्यांनाच प्रेम करण्याचा नैतिक अधिकारी असतो. खऱ्या प्रेमामध्ये त्यागाची भूमिका फार मोठी असते. आणि ज्यांना त्याग करायला जमतं त्यांनाच जीवनामध्ये खरं प्रेम लाभते. आपल्याला जगातील सर्व विचारवंतानी, महापुरूषांनी, तत्ववेत्यांनी एकमेकांवर प्रेम करावयाची शिकवण दिली. पण प्रेम करत असताना त्या प्रेमाचा अर्थही नीट कळायला हवा, असे प्रतिपादन कवी प्रकाश घोडके यांनी केले.यशवंत महाविद्यालयात आयोजित काव्य मैफीलीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. त्यांनी ‘प्रेम’ या आशयावर सरस आणि दर्जेदार कविता सादर करून विद्यार्थ्यांना प्रेमाचा खरा अर्थ समजावून सांगितला. मराठी विभागाच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. वीरेंद्र बैस होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. न. ह. खोडे, प्रा. प्रमोद नारायणे यांची उपस्थिती होती. ‘तुझ्या येण्याला वेळ नसते’, ‘असा बावळा सावळा’, ‘उभा जन्म झाला उन्हाळ उन्हाळ’, ‘तुझे ओठ ताजे जसा पावसाळा’ या सारख्या कसदार अशा कविता सादर करून कवी प्रकाश घोडके यांनी उपस्थितांची मने जिंकली.शिवाय ‘तुझ्या दाराहून जाता, डोळे अडले दारात, अनं तुझ्या डोईचा पदर, नीट राहिना वाºयात’, ‘गढुळल्या दाही दिशा, कडू झाली सारी वाणी, अरे आता धुवून वापरा, घरी पावसाचे पाणी’ या कविता सादर करून कवी प्रकाश घोडके यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. न.ह. खोडे यांनी प्रास्ताविकातनू विद्यार्थ्यांना कवितेचे महत्व पटवून दिले. शिवाय त्यांनी व्यासपीठावर उपस्थित पाहुण्यांना परिचय करून दिला. कार्यक्रमाचे संचालन गौरव तामगाडगे यांनी केले तर आभार प्रा. उमा खनाडे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.‘खुळा जीव माझा तुला साद घाली’ ला मिळाला भरभरून प्रतिसादखुळा जीव माझा तुला साद घाली, उभा कृष्ण मेघांचा नेत्र भार झेली. तुला पाठमोरी किती वेळ पाहू, नको आज वेडे अशी दूर राहू, या सरस कवितेला उपस्थित विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी टाळ्यांची साथ देऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी कवीने एकापेक्षा एक सरस कविता सादर करून उपस्थितांचे मने जिंकली.