शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पिस्टलच्या धाकावर मुत्तूट फिनकॉर्पमध्ये दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 05:00 IST

कुरिअर बॉयने तिघांच्या नावाचे कुरिअर दिले. मात्र, एकाचे कुरिअर ॲड. शाह यांनी पाठविले असून ते आणायचे राहिल्याचे सांगितले.  एका कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या पाहिजे, असे म्हणून तो कंपनी व्यवस्थापकाच्या कक्षाकडे गेला. दरोडेखोर व्यवस्थापकाच्या कक्षाकडे जात असल्याचे पाहून दीपिका हिंगे हिने त्यास विचारणा केली असता दरोडेखोराने दीपिकाच्या गळ्यावर चाकू लावून पिस्टलचा धाक दाखवून इतर तिघांना आधी सोने आणि नंतर रोख आणण्यास सांगितले.

ठळक मुद्देगुरुवारी सकाळचा थरार : तीन लाख रुपयांच्या रोखेसह अडीच किलो सोने पळवून केला घटनास्थळाहून पाेबारा

  लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील मुख्य मार्गालगत असलेल्या मुत्तूट फिनकॉर्प फायनान्स कंपनीच्या ऑफिसवर भल्या सकाळीच सशस्त्र दरोडा पडला. गुरुवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दरोडेखोराने महिला कर्मचाऱ्यावर पिस्टल रोखून तसेच चाकूचा धाक दाखवून अडीच किलो सोने आणि ३ लाख रुपयांची रोख असा एकूण अंदाजे ६६ लाखांचा ऐवज चोरुन नेल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी दिली. प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ८.५९ वाजताच्या सुमारास मुत्तूट फायनान्स कंपनीचे कार्यालय उघडले. दोन महिला आणि दोन पुरुष कर्मचारी कार्यालयात गेले. ९ वाजताच्या सुमारास एक व्यक्ती तोंडाला मास्क आणि काळ्या रंगाचे कपडे परिधान करून कुरिअर बॉय असल्याचे सांगून फायनान्स कंपनीच्या कार्यालयात आला. यावेळी कार्यालयात अक्षय खेरडे, महेश श्रीरंगे, दीपिका हिंगे आणि स्नेहल नामक कर्मचारी उपस्थित होते. कुरिअर बॉयने तिघांच्या नावाचे कुरिअर दिले. मात्र, एकाचे कुरिअर ॲड. शाह यांनी पाठविले असून ते आणायचे राहिल्याचे सांगितले.  एका कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या पाहिजे, असे म्हणून तो कंपनी व्यवस्थापकाच्या कक्षाकडे गेला. दरोडेखोर व्यवस्थापकाच्या कक्षाकडे जात असल्याचे पाहून दीपिका हिंगे हिने त्यास विचारणा केली असता दरोडेखोराने दीपिकाच्या गळ्यावर चाकू लावून पिस्टलचा धाक दाखवून इतर तिघांना आधी सोने आणि नंतर रोख आणण्यास सांगितले. दरोडेखोर एकटाच असल्याने त्याने आपल्या सोबत बॅग आणली होती. त्या बॅगमध्ये त्याने सोने आणि रोख टाकून कर्मचाऱ्यांना डांबून तेथून पळ काढला. याप्रकरणी ग्राहक प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले अक्षय खेरडे याने  शहर पोलिसात तक्रार दिली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे, ठाणेदार सत्यवीर बंडीवार, ठाणेदार धनाजी जळक दाखल झाले. पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरोडेखोराच्या शोधात गुन्हे शाखेची चमू, शहर पोलीस ठाण्याची चमू रवाना झाली असून आरोपी पोलिसांच्या रडारवर           आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.  या प्रकरणात पुढील तपास पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे. 

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दरोडेखोर झाला कैद फायनान्स कंपनीच्या कार्यालयात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा कैद झाला असून त्याला पकडण्यासाठी चार ते पाच पोलीस पथक रवाना झाले आहे. त्यामुळे लवकरच दरोडेखोरास अटक करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी सांगितले. 

दरोड्याचा घटनाक्रम मिनिट टू मिनिट...

८.५९ वाजता कार्यालय उघडले.९ वाजता दरोडेखोर कुरिअर बॉय म्हणून कार्यालयात आला.९.५ वाजता महिला कर्मचाऱ्याच्या गळ्यावर  चाकू लावला.९.१५ वाजता कर्मचाऱ्यांना खोलीत डांबले.९.१७ वाजता दरोडेखोर ऐवज घेऊन पळाला. ९.१० वाजता सफाई कर्मचारी कार्यालयात दाखल झाली.९.२० वाजता पोलिसांना फोन केला.९.२५ वाजता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

कर्मचाऱ्यांना लॉकर रुममध्ये डांबलेदरोडेखोराने जवळील पिस्टल काढून महिला कर्मचारी दीपिका हिंगे हिच्या गळ्यावर चाकू लावून इतर कर्मचाऱ्यांना सोने आणि रोख बॅगमध्ये ठेवण्यास सांगितले. त्यांच्याजवळील मोबाईल आणि पर्स बाहेर काढून चौघाही कर्मचाऱ्यांना लॉकररुममध्ये डांबून ऐवज भरलेली बॅग घेऊन तेथून पळ काढला. महिला सफाई कर्मचाऱ्याने उघडला दरवाजा९.१० मिनिटाने सफाई कर्मचारी ललिताबाई या फायनान्स कंपनीच्या कार्यालयात आल्या असता आरडाओरड ऐकू आली. त्यांनी लगेच कार्यालयात जावून पाहिले असता सर्व कर्मचारी लॉकररुममध्ये डांबून असल्याचे पाहिले त्यांनी तत्काळ चाबीने कुलूप उघडले. दरम्यान अक्षय खेरडे याने वरच्या माळ्यावर श्रीराम फायनान्स कंपनीतील कर्मचाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. 

ठसे तज्ज्ञ, श्वान पथक दाखलघटनेची माहिती शहरात पसरताच सर्वत्र खळबळ उडाली. भल्या सकाळी दरोडा पडल्याने घटनास्थळी नागरिकांची गर्दी उसळली. घटनास्थळी ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. तसेच श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.

पैसे भरलेली बॅग घेतल्यानंतर दरोडेखोराने कर्मचारी महिलेची दुचाकीही पळविलीदरोडेखोराने ऐवज भरलेली थैली घेतल्यावर महिला कर्मचारी दीपिका हिंगे हिच्यावर पिस्टल रोखून तिला दुचाकीची चावी मागितली. चोरट्याने दुचाकीची चावी घेत दीपिकाच्या एम.एच.३२ झेड.०१७० क्रमांकाच्या दुचाकीने तेथून पळ काढला. दरोडेखोराला दीपिकाजवळ दुचाकी आहे, हे कसे माहिती? दरोडेखोर फायनान्स कंपनीबाहेर दबा धरून बसला होता का, त्याच्यासोबत आणखी सहकारी होते का, याचा तपास पोलीस करीत आहेत.  

 

टॅग्स :Robberyचोरी