शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गुंगीचे औषध देऊन रेल्वे प्रवाशांना लुटणारी टोळी वर्ध्यात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 15:33 IST

रेल्वे प्रवासादरम्यान अनोळखी प्रवाशांशी जवळीक साधून त्यांना एखाद्या खाद्यपदार्थात गुंगीचे औषध देऊन त्यांचे साहित्य लंपास करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला वर्धा लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद केले आहे.

ठळक मुद्देलोहमार्ग पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: रेल्वे प्रवासादरम्यान अनोळखी प्रवाशांशी जवळीक साधून त्यांना एखाद्या खाद्यपदार्थात गुंगीचे औषध देऊन त्यांचे साहित्य लंपास करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला वर्धा लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीतील तीनही सदस्य व एक महिला तरुण असून ते उत्तरप्रदेश राज्यातील गोंडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. तर महिला ही दिल्ली येथील रहिवासी आहे. या टोळीतील सदस्यांनी सुमारे १३ गुन्ह्याची कबुली लोहमार्ग पोलिसांना दिली असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता लोहमार्ग पोलिसांकडून वर्तविली जात आहे.कन्हैय्या सुकई यादव (२३), मनोजकुमार रामनरेश सिंग (२२), सोनू रामअभिलाश शुक्ला (२४) व सीमा मनोजकुमार सिंग (२२) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वर्धा लोहमार्ग पोलिसांनी गस्ती दरम्यान दोन संशयास्पद तरुणांना ताब्यात घेतले. अधिक विचापूस केली असता त्यांनी प्रवाशांना गुंगीचे औषध खाद्यपदार्थात देऊन त्यांच्याकडील साहित्य आम्ही पळवित असल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानंतर कन्हैय्या व सोनू याला वर्धा लोहमार्ग पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही आरोपींची सात दिवसीय पोलीस कोठडी ठोठावली. याच पोलीस कोठडीदरम्यान वर्धा लोहमार्ग पोलीस ठाण्याची एक चमू आरोपी कन्हैय्या याला सोबत घेऊन या टोळीतील मुख्य आरोपी असलेल्या मनोजकुमार याचा शोध घेण्यासाठी दिल्ली रवाना झाली. कन्हैय्याने दिलेल्या माहितीवरून मनोजकुमार याला ताब्यात घेऊन सदर पोलीस चमू वर्धेच्या दिशेने परतीचा प्रवास करीत असताना मध्यप्रदेशातील तिगाव नजीकच्या रेल्वे स्थानक येण्यापूर्वी कन्हैय्या आणि मनोजकुमार यांनी वर्धा लोहमार्ग पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. परंतु, त्यानंतर वर्धा लोहमार्ग पोलिसांनी नव्या जोमाने कामाला लागून फरार झालेल्या कन्हैय्या यादव आणि मनोजकुमार सिंग यांना जयपूर येथून अटक केली. विशेष म्हणजे या दोघांनी मित्राच्या घरी जयपूर येथे आश्रय घेतला होता. दरम्यानच्या तपासात या टोळीला सिमा मनोजकुमार सिंग ही महिलाही सहकार्य करीत असल्याचे पुढे आल्याने तिलाही वर्धा लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. सदर चोरट्यांच्या टोळीतील सदस्यांनी सुमारे १३ गुन्ह्याची कबुली वर्धा लोहमार्ग पोलिसांना दिली आहे. ही कारवाई लोहमार्ग पोलीसचे पोलीस अधीक्षक अमोक गावकर, राजपुत, वर्धा लोहमार्ग पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन वडते यांच्या मार्गदर्शनात ढोणेकर, हनवते, लोटावार यांनी केली.सोनूची रवानगी न्यायालयीन कोठडीतया चोरट्यांच्या टोळीतील आरोपी असलेल्या सोनू रामअभिलाश शुक्ला याची पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर कन्हैय्या आणि मनोज हे पोलीस कोठडीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी