लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील वंजारी चौक ते सिंदी (मेघे) येथे जाणाºया रस्त्याचे सिमेंटीकरण दुर्लक्षीत कारभारामुळे थंडबस्त्यात आहे. परिणामी, या मार्गाने ये-जा करणाºया वाहनचालकांना व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे शुक्रवारी युवा परिवर्तन की आवाजच्या तरुणांनी रामनगर पोलीस ठाण्यासमोर धरणे दिले.या रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले असून कडेला नाली नसल्याने पावसाळ्यात या मार्गावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून चिखल तयार होतो. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात युवा परिवर्तन की आवाजने ३१ आॅगस्टला संबंधितांना निवेदन सादर केले होते. परंतु, त्याकडे दुर्लक्षच झाले. आज लोकप्रतिनिधी, नगर पालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात रामनगर पोलीस ठाण्यासमोर धरणे देण्यात आले. आंदोलनादरम्यान मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर केले. या निवेदनातून लोकप्रतिनिधींकडून विकासाचा कांगावा होत असून प्रत्यक्षात मात्र काहीच नसल्याचा आरोप करण्यात आला. या रस्त्याच्या सिमेंंटीकरणाकरिता ९९.२४ लाखाचा निधी २५ जुलै २०१६ ला नगरविकास मंत्रालयातून उपलब्ध झाला आहे. सदर रस्त्याच्या सिमेंटीकरणाचा कंत्राटही देण्यात आला आहे. परंतु कामाचा पत्ता नाही.या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. या आंदोलनात निहाल पांडे, पलाश उमाटे, राहुल मिश्रा, समीर गिरी, धरम शेंडे, गौरव वानखेडे, अभिषेक बाळबुधे, ऋषिकेश बुटले यांच्यासह युवा परिवर्तन की आवाजचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.वंजारी चौक ते अग्निहोत्री कॉलेजपर्यंतच्या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. खरेतर सदर रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे थांबले आहे. न.प.च्या निवडणूक काळातच आचार संहिता संपल्यावर हा रस्ता पूर्ण होणे अपेक्षीत होते. परंतु, तसे झाले नाही. या रस्त्याचे काम त्वरित सुरू होणे गरजेचे आहे.- पवन राऊत, नगरसेवक न.प.वर्धा.
रस्त्यासाठी तरुणांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 22:18 IST
येथील वंजारी चौक ते सिंदी (मेघे) येथे जाणाºया रस्त्याचे सिमेंटीकरण दुर्लक्षीत कारभारामुळे थंडबस्त्यात आहे. परिणामी, या मार्गाने ये-जा करणाºया वाहनचालकांना व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्यासाठी तरुणांचे धरणे
ठळक मुद्देयुवा परिवर्तन की आवाजचे आंदोलन