शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने लावली रस्त्यांची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 23:55 IST

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उन्हाळ्यात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या कामावर मोठ्या प्रमाणावर निधी जिल्ह्यांना मंजूर झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक मार्गावरचे खड्डे बुजविण्याचे काम केले.

ठळक मुद्देशहरी व ग्रामीण भागात खड्डेच खड्डे : बांधकाम विभागाचा खड्डेमुक्त महाराष्ट्र कार्यक्रम फेल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उन्हाळ्यात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या कामावर मोठ्या प्रमाणावर निधी जिल्ह्यांना मंजूर झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक मार्गावरचे खड्डे बुजविण्याचे काम केले. आता मात्र पहिल्याच पावसात ग्रामीण भागात व शहरी भागात रस्त्यांना मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. या खड्ड्यांतून नागरिकांना वाट काढणे कठीण झाले आहे. वर्धा शहरालगतच्या यवतमाळ मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे रस्त्यावर पडले आहेत. या मार्गावरून जड वाहनांची वाहतूक होत आहे. तसेच अनेक दुचाकीस्वारांना अपघातही झालेले आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. सेवाग्राम ते खरांगणा गोडे या मार्गावरही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहन चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच व्हीआयपी रोडपासून म्हसाळा वरूड कडे जाणाऱ्यावर रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. या मार्गावरून दररोज शाळकरी मुलांना घेऊन जाणारे शेकडो वाहने जातात. मध्यंतरी अग्रगामी शाळेच्या पालकांनी या खड्ड्यांबाबत स्थानिक आमदारांकडे तक्रार केली होती. त्यानंतर म्हसाळा ते वरूड या रस्त्यासाठी निधी मंजूर झाल्याचे फलक लावण्यात आले अजूनही या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. भर पावसाळ्यात अ‍ॅटो चालकांना कसरत करावी लागत आहे. पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांत चिखल पाणी जमा होते व अनेकदा नागरिकांच्या अंगावरही ते पाणी उडते. पावसाळ्याच्या दिवसात रस्त्याची अतिशय दशनिय अवस्था झाली आहे.पांदण रस्त्यांचेही हालजिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून जिल्ह्यात अनेक पांदन रस्त्यांचा विकास करण्यात आला. मात्र पावसाळ्याच्या दिवसात या पांदन रस्त्यांमध्ये चिखल निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना शेतीसाहित्य शेतात नेताना पायी न्यावे लागत आहे. पादंन रस्त्यातून बैलबंडी जाणे कठीण झाले आहे. शासनाने पांदन रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सेलू तालुक्यातील जाखाळा शिवारात शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच वर्धा शहरातही विकास कामे मोठ्या प्रमाणावर झालीत. तरीही अनेक रस्त्यांवर खड्डे कायम आहेत. या रस्त्यांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :Rainपाऊसpwdसार्वजनिक बांधकाम विभाग