लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : शेतकऱ्यांनी श्रमदान करीत लोकवर्गणी करून शेताकडे जाणारा पांदण रस्ता सुस्थितीत केला आहे. सदर रस्ता सुस्थितीत करण्याची मागणी असताना लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्षच करण्यात धन्यता मानत होते. सुमारे लाख रुपयांची लोकवर्गणी करून सदर रस्ता सुस्थितीत करण्यात आला हे विशेष.नजीकच्या गिरड-पिंपळ या मार्गावर शेती असणाऱ्या ५० शेतकऱ्यांनी १ लाख रुपयांची लोकवर्गणी करून शेतात जाणारी वाट सुकर केली आहेत. लोकप्रतिनिधींपुढे रस्त्याचे गाऱ्हाणे मांडले; पण प्रत्यक्षात फायदा झाला नाही. अखेर शेतकऱ्यांनीच एकत्र येत आपला मार्ग शोधला आहे. गिरड-पिपळा या मार्गावर असलेल्या ५० शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी रस्त्याच सुस्थितीत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्याच्या दिवसात तर साधे पाणी ये-जा करणेही कठीण होत होते. काही सुजान नागरिकांनी सदर समस्या लोकप्रतिनिधींना सांगितली. परंतु, त्यांच्याकडूनही पाठ दाखविण्यात धन्यता मानण्यात आली. शेवटी एकजुटीत काय ताकद आहे हे लोकवर्गणी व श्रमदानाच्या माध्यमातून रस्ता ये-जा करण्या योग्य करून तेथील शेतकºयांनी लोकप्रतिनिधींना दाखवून दिले आहे.
श्रमदानातून रस्ता झाला सुस्थितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 01:03 IST
शेतकऱ्यांनी श्रमदान करीत लोकवर्गणी करून शेताकडे जाणारा पांदण रस्ता सुस्थितीत केला आहे. सदर रस्ता सुस्थितीत करण्याची मागणी असताना लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्षच करण्यात धन्यता मानत होते. सुमारे लाख रुपयांची लोकवर्गणी करून सदर रस्ता सुस्थितीत करण्यात आला हे विशेष.
श्रमदानातून रस्ता झाला सुस्थितीत
ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : लाख रुपयांची गोळा केली लोकवर्गणी