शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दहेगाव (गो.)चा मार्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:03 IST

खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार आणि जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या मध्यस्थीने अखेर दहेगाव (गो.) येथील रेल्वे बोगद्याला जोडणारा जुनाच रस्ता सुरू करण्यात आला आहे. लवकरच जागा संपादीत करून प्रश्न निकाली काढण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर पाच दिवसाच्या घडामोडीवर पडदा पडला आहे.

ठळक मुद्देभूसंपादन विभाग सकारात्मक : बेजबाबदारांवर होणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार आणि जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या मध्यस्थीने अखेर दहेगाव (गो.) येथील रेल्वे बोगद्याला जोडणारा जुनाच रस्ता सुरू करण्यात आला आहे. लवकरच जागा संपादीत करून प्रश्न निकाली काढण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर पाच दिवसाच्या घडामोडीवर पडदा पडला आहे.सेलू तालुक्यातील दहेगाव येथे रेल्वे रुळ पार करण्यासाठी असलेल्या बोगद्याला जोडणारा रस्ता शुक्ला नामक शेतकऱ्याने बंद केला होता. या रस्त्याचा विषय न्यायालयीन प्रक्रियेत २० वर्षांपासून प्रलंबित होता. नुकताच त्याचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागला. त्यामुळे गत वर्षी या रस्त्याचा ताबा घेण्याचा प्रयत्न झाला. नागरिकांची व प्रशासनाची अडचण लक्षात घेता सदर शेतकऱ्याने रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रशासनास एका वर्षाची मुदत दिली होती; पण प्रशासन कुंभकर्णी झोपेतच होते. शेवटी १४ फेब्रुवारीला शेतकऱ्याने जागेचा ताबा घेतल्याने रस्ताच बंद झाला होता. परिणामी, चांगलीच तारांबळ उडाली होती. शिवाय नागरिकांसाठी दळणवळणाची गंभीर समस्या निर्माण झाल्याने काल ठिय्या देण्यात आला. त्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, रेल्वेचे विदर्भ प्रबंधक सोमेश्वरकुमार, खा. रामदास तडस, आ. समीर कुणावार, माजी आमदार राजू तिमांडे, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, तहसीलदार महेंद्र सोनोणे, बांधकाम विभागाचे अनिल तोडे यांची बैठक झाली. त्या शेतकऱ्याला जागेचा मोबदला देत रस्ता मोकळा करण्याची हमी दिली आहे. परिणामी बंद करण्यात आलेला हा मार्ग ये-जा करण्यासाठी मोकळा करून देण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून मुदत मिळाल्यानंतरही दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे संकेत जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्याकडून देण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाला अर्धविराम मिळाला असला तरी चौकशीत काय पुढे येते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस