शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता खोदकामात नळजोडणीची नासधूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 22:06 IST

आर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाकापर्यंतच्या एकेरी रस्त्याचे सिमेंटीकरण सुरू आहे. याकरिता केल्या जात असलेल्या खोदकामामुळे नळजोडणीचे पाइप तोडले जात असून पाणीटंचाईच्या काळात दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईच्या काळात हजारो लिटर पाण्याचा अपव्यय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाकापर्यंतच्या एकेरी रस्त्याचे सिमेंटीकरण सुरू आहे. याकरिता केल्या जात असलेल्या खोदकामामुळे नळजोडणीचे पाइप तोडले जात असून पाणीटंचाईच्या काळात दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. सोबतच या बाजूने टेलिफोन लाईन, केबल लाईनसुद्धा आहे. असे असताना सर्व्हिसिंगकरिता जागा सोडण्यात आलेली नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी अत्याचार निर्मूलन समितीने नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाका जुना पाणी रस्ता बांधकामाकरिता तब्बल ३५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. आर्वी नाका ते जुना पाणी चौकापर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम अडथळ्यांची शर्यत पूर्ण करीत पूर्णत्वास गेले आहे. शिवाजी चौक ते आर्वी नाका चौकापर्यंत भुयारी गटार योजनेचे काम करण्यात आले. आता एकेरी रस्त्याच्या सिमेंटीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, कामात नियोजनाचा प्रचंड अभाव आहे.खोदकाम करताना नळजोडणीची नासधूस केली जात आहे. याशिवाय भविष्यात टेलिफोन व केबल लाइनच्या दुरुस्तीच्या दृष्टीने जागा सोडण्यात आलेली नसून काम सुरू आहे. यामुळे कालांतराने परत रस्ता फोडण्याची नामुष्की ओढवू शकते. जिल्ह्यात यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे पाणीटंचाईसदृश परिस्थिती आहे. यातच शहरात विविध भागांत बांधकामाचा सपाटा सुरू आहे. खोदकामादरम्यान नळजोडणी तोडली जात असल्याने पाणीटंचाईच्या काळात हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. मात्र याचा कुठेही विचार केला जात नसल्याचे दिसून येते. टेलिफोन लाईन, केबल लाइन दुरुस्तीकरिता जागा सोडण्यासोबतच पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या अनुषंगाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अत्याचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष सुधीर दंदे यांच्यासह नागरिकांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.कामाचा दर्जाही सुमारशहरात अनेक ठिकाणी रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले. मात्र, वर्षा लोटत नाही तोच अनेक रस्त्यांना शेकडो भेगा गेल्या आहेत. आर्वी नाका ते बॅचलर रोड, आर्वी नाका ते जुना पाणी चौकापर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा गेल्या आहेत. अल्पावधीतच रस्त्यांची डागडुजीही करावी लागली. त्यामुळे बांधकामे करताना ती दर्जेदारच करावी, अशी मागणीही नागरिकांतून होत आहे.पाणीटंचाई लक्षात घेता बांधकामे थांबवावीअल्प पर्जन्यमानामुळे यंदा जिल्ह्यातील मध्यम आणि लघु जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा नाही. याचाच परिणाम म्हणून शहरात सहा ते सात दिवसांनंतर तर लगतच्या ग्रामीण भागांत पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. कुठे ना कुठे दररोज २०० ते २५० फूट बोअरवेल केल्या जात असतानाही पाणी लागेनासे झाले आहे. एप्रिल महिन्यातच ही परिस्थिती आहे. असे असताना नियोजनाच्या अभावात विकासकामांचा सपाटा सुरू आहे. पिण्यासही पाणी मिळेनासे झाले असताना बांधकामांवर पाण्याची उधळपट्टी केली जात आहे. बांधकामे थांबविण्यात यावी, अशीही मागणी वर्धेकर नागरिकांतून होत आहे.एलईडी दिव्याचा खांब कोसळलाकामाचा दर्जा राखला जात नसल्याने अल्पावधीतच पितळ उघडे पडत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत एलईडी दिवे लावण्यात आले. यातील एक खांब वाºयाच्या झोताने कोसळला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. यावेळी कामाच्या दर्जाविषयी नागरिकांनी मात्र प्रश्न उपस्थित केला.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई