शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आरओ प्लांट व्यवसायाला तीन विभागांची परवानगी आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 05:00 IST

 लाेकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात सुमारे ४०० च्यावर आरओ प्लांट आहेत. पण हे सर्वच व्यवसाय आवश्यक परवानगी न ...

ठळक मुद्देजिल्ह्यातील एकाही व्यावसायिकाने अद्याप केली नाही पाण्याची तपासणी

 लाेकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सुमारे ४०० च्यावर आरओ प्लांट आहेत. पण हे सर्वच व्यवसाय आवश्यक परवानगी न घेताच सुरू असल्याचे लक्षात आल्यावर प्रशासनाने धडक कारवाईला सुरूवात केली. आरओ प्लांट व्यवसायासाठी केंद्रीय भुजल मंडळ, अन्न व औषध प्रशासन तसेच आरोग्य विभागाचे नाहकत प्रमाणपत्र आवश्यक असून त्यानंतरच त्यांना रितसर परवानगी दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.प्रशासनाने कारवाई करण्यास सुरूवात केल्यावर जिल्ह्यातील आरओ प्लांट व्यावयायिकांनी आपला व्यवसाय तात्पूर्ता बंद ठेवला आहे. असे असतानाही जिल्ह्यात नेमके किती आरओ प्लांट व्यावसायिक आहेत याची माहितीच भूजल सर्वेक्षण विभागाकडे नाही. या व्यावसायिकांना त्यांच्या पाण्याच्या स्त्रोताची भूजल सर्वेक्षण विभागाकडून तपासणी करून घेणे क्रमप्राप्त आहे. पण मागील पाच वर्षांत एकाही आरओ प्लांट व्यावयायिकाने त्यांच्या पाण्याच्या स्त्रोतातील पाण्याचे नमुने घेवून त्याची तपासणीच केली नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

परवानगी २०० फुटांची तर जमीन पोखरली ४०० फूटवर्धा शहरासह जिल्ह्यातील अनेक आरओ प्लांट व्यावसायिकांनी त्यांच्या प्लांटच्या आवारात बोअरवेल करताना शासकीय नियमांना बगलच दिली आहे. कुठल्याही व्यक्ती किंवा संस्थेला पिण्याच्या पाण्याच्या वापराकरिता केवळ २०० फुटापर्यंतच बोअरवेल करण्याची परवानगी दिली जाते. पण जिल्ह्यातील अनेक आरओ प्लांट व्यावसायिकांनी ३५० फुटापेक्षाही जास्त खोल बोअरवेल केल्याचे वास्तव आहे.

जलस्त्रोत तपासणीचा आदेश देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनाजिल्ह्यातील सर्वच आरओ प्लांट व्यावसायिकांच्या पाण्याच्या स्त्रोतांच्या खोलीची तपासणी होणे गरजेचे आहे. ही तपासणी करण्यासाठी भूजल सर्वेक्षण विभाग तयार असला तरी त्याला जिल्हा प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांच्या लेखी सूचनांची प्रतीक्षा आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आदेश दिल्यावर भूजल सर्वेक्षण विभाग जिल्ह्यातील सर्वच आरओ प्लांट व्यावसायिकांच्या पाण्याच्या स्त्रोतांच्या खोलीची तपासणी करणार आहे.

केवळ तीन मीटरवरच राहतो मालकी हक्कशासकीय नियमानुसार भू-गर्भातील पाणी ही राष्ट्रीयच संपत्ती आहे. कुठल्याही खासगी मालमत्तेवर तीन मिटर खोलपर्यंत त्या मालमत्ता धारकाचा अधिकार असतो. तर त्यानंतरच्या नैसर्गिक संपत्ती, पाणी तसेच इतर गौनखनिजांवर नियमानुसार शासनाचाच मालकी हक्क राहतो, असे नाव न प्रकाशित करण्यातच्या अटीवर एका अधिकाऱ्यांने सांगितले. 

आरओ प्लांट व्यावसायिकांना केंद्रीय भूजल मंडळ, अन्न व औषध प्रशासन तसेच आरोग्य विभागाकडून परवानगी घेणे क्रमप्राप्त आहे. त्यानंतरच त्यांच्या आरओ प्लांटला रितसर परवानगी मिळू शकते. जिल्ह्यातील अनेक आरओ प्लांट व्यावसायिकांनी नियमांना बगल देत जास्त खोलीच्या बोअरवेल खोदल्याच्या तक्रारी आहेत. पण भूजल सर्वेक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी सूचना दिल्यावर आम्ही या व्यावसायिकांच्या बोअरवेलची तपासणी करू शकतो. शिवाय त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करू शकतो.- राजेश सावळे, वरिष्ठ भू-वैज्ञानिक, वर्धा. 

टॅग्स :Waterपाणी