शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

व्हर्च्युअल ह्युमन लॅब वैद्यकशास्त्रासाठी क्रांतिकारी

By admin | Updated: November 19, 2016 01:12 IST

मानवी शरीररचनेतील इत्यंभूत व अद्यावत प्रशिक्षण देणारी आशिया खंडातील पहिली व्हर्च्युअल ह्युमन लेबॉरेटरी ....

मिश्रा यांची माहिती : आशियातील पहिले प्रशिक्षण वर्धा : मानवी शरीररचनेतील इत्यंभूत व अद्यावत प्रशिक्षण देणारी आशिया खंडातील पहिली व्हर्च्युअल ह्युमन लेबॉरेटरी दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठातील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात कार्यान्विय झाली आहे. या प्रयोग शाळेत पहिला अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅनाटामेज टेबल स्थापित केला असून अमेरिकन हार्ट असोसिएशनद्वारे आशियातील पहिले प्रशिक्षण केंद्र म्हणून याला मान्यता दिल्याची माहिती विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी सावंगी (मेघे) येथे पत्रपरिषदेत दिली.रूग्ण, डॉक्टर, विद्यार्थी आणि वैद्यकीय व्यवस्थापनासाठी उपयुक्त असणाऱ्या या अद्यावत सुविधेबद्दल माहिती देताना डॉ. मिश्रा म्हणाले, सावंगीच्या आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाने अथक परिश्रमातून मिळविलेल्या गुणवत्तेमुळे आणि या तंत्रज्ञानामुळे मानवी शरीरांतर्गत झालेल्या दुखापती, विकास अथवा बदलांबाबत प्राप्त अतिसुक्षम व अचून माहिती डॉक्टरांना सहायभूत ठरणारी आहे. त्यासोबतच शस्त्रक्रियेनंतर शरीराच्या आत होणाऱ्या बदलांबाबत शस्त्रक्रियेपूर्वीच्या रुग्णालाही या उपकरणामुळे स्पष्ट कल्पना येते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा अनिवार्य भाग असणाऱ्या शवविच्छेदनाचे कामही या उपकरणामुळे सोपे झाले असून गरजेपुरता मानवी मृतदेहांचा वापर वगळता या उपकरणामुळे शरीररचनेतील अतिसुक्ष्म बाबी विनाअपाय अचूकपणे समजून घेता येतील. अपघाती अथवा अंतर्गत दुखापतीमुळे मृत्यूचे कारणही शवविच्छेदनाशिवाय या उपकरणामुळे कळणे सोपे झाले आहे, असे ही डॉ. मिश्रा सांगितले.(शहर प्रतिनिधी)