शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

टिश्यू कल्चरमुळे केळीच्या लागवडीत क्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:21 IST

केळीचा कॅलिफोर्निया म्हणून प्रसिद्ध असलेल्या वर्धा जिल्ह्यातून केळीचे पीक हद्दपार होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. अशातच पवनार येथील कुंदन वाघमारे या शेतकऱ्यांने ४० हजार पील लागवडीचे नियोजन केले आहे.

ठळक मुद्देविदर्भात विक्रम : पवनारच्या शेतकऱ्याने केले ४० हजार पिलांचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केळीचा कॅलिफोर्निया म्हणून प्रसिद्ध असलेल्या वर्धा जिल्ह्यातून केळीचे पीक हद्दपार होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. अशातच पवनार येथील कुंदन वाघमारे या शेतकऱ्यांने ४० हजार पील लागवडीचे नियोजन केले आहे. जवळपास ३३ हजार पिलांची लागवड पूर्ण झाली असून उन्हाळ्यातील ४७ डिग्री सेल्सीयस तापमानातही त्यांच्या केळीला कुठलेही नुकसान झाले नाही, हे विशेष.वाघमारे यांनी पवनार येथील शेतात २० फेब्रुवारी २०१८ ला ७ हजार ५०० टिशू कल्चर केळीच्या पिलांची लागवड केली. तपत्या उन्हातही त्यांनी केळीचे व्यवस्थित संगोपन केले. त्यानंतर लगेच १० जूनला १८ हजार टिशू केळींची पुन्हा लागवड केली. जुनी असलेली ७ हजार ५०० केळी खांब उत्पन्नाच्या तयारीत आहे. आता १५ आॅगस्टला ७ हजार ५०० केळी खांबाची लागवड केली जाणार आहे. एकूण ४० हजार केळी खांबांची लागवड वाघमारे यांच्या शेतात होत आहे. केळीच्या मध्ये दुसरे आंतरपिकही ते घेत असल्याने त्यांना दुहेरी उत्पन्नाचे साधन या माध्यमातून मिळाले आहे. विदर्भात नागपूर व वर्धा जिल्ह्यात केळीची लागवड केली जाते. हा विदर्भातील केळी लागवडीचा विक्रमच ठरला आहे. खानदेशातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या या केळी बगीच्याची पाहणी केली. शिवाय व्यवस्थापनाची माहिती जाणली. केळी लागवडीचे काम मजुरांकडून सुरू आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती