शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

सोमवारीच घेतली आढावा बैठक

By admin | Updated: January 19, 2016 03:20 IST

गत महिन्यात २८ डिसेंबरला जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक

पंचायत समित्यांतील प्रकार : पालकमंत्र्यांच्या सूचनांचा पडला विसरपराग मगर ल्ल वर्धागत महिन्यात २८ डिसेंबरला जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक घेण्यात आली. यात सर्व अधिकाऱ्यांनी सोमवारी मुख्यालयात राहणे अनिवार्य आहे. कोणत्याही बैठकीस उपस्थित राहू नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या; पण या सूचनाच पंचायत समिती स्तरावर न पोहोचल्याने जिल्ह्यातील आठही पंचायत समितीमध्ये ग्रामसचिवांची आढावा बैठक घेण्यात आली. यामुळे सोमवारच्या आदेशाचा प्रशासनास विसर पडल्याचे दिसून आले. ही बाब लक्षात आल्यावर वर्धा पं.स. ची बैठक त्वरित स्थगित करण्यात आली; पण काही समित्यांच्या बैठकी सुरूच होत्या. महिन्याच्या प्रत्येक २ व १८ तारखेला प्रत्येक तालुक्यातील ग्रामसचिवांची बैठक पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतली जाते. यात अनेक मुद्दे चर्चिले जातात. सूचनाही केल्या जातात. त्यामुळे यात वावगे असे काहीच नाही; पण तालुक्यातील सर्वच ग्रामसेवक तालुक्याच्या ठिकाणी या दिवशी राहत नसल्याने ग्रामस्थांच्या कामाचा होत असलेला खोळंबा, ही बाब नवीन नाही. रविवारच्या सुटीनंतर सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असतो. त्यामुळे आपली कामे व्हावी, अशी स्वाभाविक इच्छा नागरिकांची असते. परिणामी, सोमवारी कुठलीही बैठक शासकीय स्तरावर आयोजित करू नये तसेच अधिकाऱ्यांनी सोमवारी मुख्यालयातच राहावे. कोणत्याही बैठकीस उपस्थित राहू नये वा बैठकीचे आयोजन करू नये, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत दिले होते; पण या सूचनेला बगल देत आठही तालुक्यात १८ जानेवारी रोजी सोमवारी बैठका बोलविण्यात आल्या. यामुळे जिल्ह्यातील सर्वच ग्रामसेवक सोमवारी तालुकास्थळी बैठकीसाठी आले होते. महिन्याच्या २ आणि १८ तारखेला अशा बैठका होत असल्याची माहिती आहे. १८ तारखेचा सोमवार पाहता ही बैठक आधी वा नंतर घेणे गरजेचे होते; पण पालकमंत्र्यांच्या सूचनाच पंचायत समिती स्तरावर पोहोचल्या नसल्याने सर्वच तालुक्यात या बैठका घेण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, ही बाब जाणून घेण्याकरिता संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता तात्काळ सूचना देण्यासाठी, ही बैठक बोलावली असून ती समाप्त झाल्याचेही सांगण्यात आले. शिवाय माहिती अभियानाची माहिती देण्याकरिता ही बैठक तात्काळ बोलविल्याचे सांगून सावरासावर करण्याचा प्रयत्नही प्रशासनस्तरावर झाला.माहिती अभियानाबाबत बैठक असल्याचे कारण४खरे पाहता सोमवारची ही बैठक रद्द करणे गरजेचे होते; पण मंगळवारी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती थेट ग्रामस्तरावर पोहोचावी म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे माहिती अभियान राबविले जात आहे. याची माहिती देण्यासाठी ही बैठक असल्याचे संबंधितांनी सांगितले. सोमवारी ग्रामसचिवांना बोलवून मंगळवारच्या कार्यक्रमाची माहिती देण्याचा हा कुठला प्रकार, असा प्रश्नही उपस्थित झाला. विशेष म्हणजे माहिती अभियानाबद्दल आधीच ग्रामसचिवांना ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर माहिती दिली होती. ज्यांचा सत्कार होणार आहे, त्यांनाही मंगळवारच्या कार्यक्रमाबद्दल पूर्ण कल्पना होती. यामुळे हा केवळ वेळ मारून नेण्याचा प्रयत्न असल्याचे निदर्शनास आले. आढावा बैठकीप्रमाणे आधी चर्चा झाल्याचेही काही ग्रामसचिवांनी ‘लोकमत’ला सांगितले. सूचना दिल्यावर बैठक बरखास्त झाल्याचे सांगण्यात आले.‘लोकमत’ने निदर्शनास आणताच सावरासावर४सोमवारी कुठल्याही विभागात अधिकारी वर्गाची बैठक घेऊ नये, अशा सूचना खुद्द पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत; पण या सूचना सर्वच स्तरावर देण्याचा जिल्हा प्रशासनाला विसर पडला. परिणामी, ‘लोकमत’ने ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर लागोलग वर्धा पंचायत समितीत सुरू असलेली बैठक थांबविण्यात आली. काही तालुक्यांत नियमाप्रमाणे ही बैठक सुरूच होती; पण उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी फोन केल्यामुळे काही ठिकाणी सुरू असलेली बैठक तात्काळ थांबविण्यात आल्याचीही माहिती आहे. पालकमंत्र्यांच्या सूचनांचा विसर४सर्व अधिकाऱ्यांनी सोमवारी मुख्यालयात राहणे अनिवार्य आहे. कोणत्याही बैठकीस उपस्थित राहू नये, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत; पण या सूचना अद्याप पंचायत समिती स्तरावर पोहोचल्याच नसल्याची माहिती आहे. यावरून या सूचना देण्यास प्रशासनाला विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहिती अभियानांतर्गत मंगळवारी असलेल्या कार्यक्रमाबद्दल तात्काळ माहिती देण्यासाठी ही बैठक बोलविण्यात आली; पण सोमवारी बैठक न घेण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना असल्याचे निदर्शनास येताच ती बरखास्त करण्यात आली. यानंतर सोमवारी कुठलीही बैठक होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.- यशवंत सपकाळे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, वर्धा.