शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

महसूल विभाग सर्वाधिक लाचखोर

By admin | Updated: December 4, 2015 02:13 IST

लाचखोरी विरोधात कितीही कायदे झाले, त्याची जनजागृती झाली तरी लाचखोरीचा प्रकार कमी होत नसल्याचे दिसून येते.

२२ महिन्यांत ३७ गुन्हे : पोलीस विभाग दुसऱ्या क्रमांकावरगौरव देशमुख वर्धा लाचखोरी विरोधात कितीही कायदे झाले, त्याची जनजागृती झाली तरी लाचखोरीचा प्रकार कमी होत नसल्याचे दिसून येते. जिल्ह्यात अडीच वर्षांत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ३७ गुन्हे दाखल केले आहेत. यात लाचखोरांना गजाआड करण्यात आले आहे. लाचखोरीत महसूल विभाग जिल्ह्यात अव्वल असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. त्यापाठोपाठ दुसरा क्रमांक पोलीस विभागाचा असल्याचे समोर आले आहे.कुठलेही काम करून घेण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून लाचेची मागणी केली जाते. हे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, २०१४ मध्ये १२ महिन्यांत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने २४ जणांविरूद्ध संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. यात ४ लाख ९९ हजार ८०० रुपयांची माया जप्त केली आहे. २०१५ मध्ये १० महिन्यांत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजू जैन यांच्या मार्गदर्शनात १४ जणांविरूद्ध संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना गजाआड केले आहे.२०१४ मध्ये केलेल्या कारवाईमध्ये महसूल विभाग ९, पोलीस विभाग ३, आरटीओ १, समाज कल्याण १, जिल्हा परिषद बांधकाम विभाग १, ग्रामविकास यंत्रणा अधिकारी १, सरपंच १, ग्रामसेवक २, न्याय विभाग १, कृषी विभाग १, महिला व बाल कल्याण विभाग १, वनविभाग १ आणि नगर विकास मंत्रालय १ असे २४ जणांचा समावेश आहे. या सर्वांना सापळा रचून एसीबीने रंगेहात पकडून गजाआड केले.२०१५ मध्ये १० महिन्यांत १२ जणांना रंगेहात पकडून गजाआड करण्यात आले. यात महसूल विभाग ४, पोलीस विभाग २, न्याय विभाग १, जिल्हा परिषद गटविकास अधिकारी १, बांधकाम विभाग १, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ १, पंचायत समिती १, कृषी विभाग १ आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ १ आदींचा समावेश आहे. २२ महिन्यांमध्ये जिल्ह्यात महसूल विभागाच्या १३ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ३७ प्रकरणांतील १३ जण महसूल विभागाचे असल्याने सर्वाधिक लाचेची मागणी महसूल विभागाकडून केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर पोलीस विभागातील पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे लाच मागण्याच्या प्रकाराला आळा घातला जावा, ही अपेक्षा असते; पण हे प्रकार फार कमी होताना दिसून येत नाही. नागरिकांची कामे सरळ व पारदर्शक होण्याकरिता कर्तव्यतत्परता जपणे गरजेचे झाले आहे. आता प्रत्येक कामाचा निश्चित कालावधी दिल्याने लाच मागण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जनजागृतीची गरजजनसामान्यांशी निगडीत महसूल विभाग लाचखोरीत अव्वल आहे. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारा पोलीस विभाग द्वितीय क्रमांकावर असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या विविध कारवाईतून स्पष्ट झाले आहे.जिल्ह्यासह देशात सर्वत्र लाचखोरीचे प्रमाण वाढले आहे. यावर पायबंद घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सदैव तत्पर आहे. लाच घेण्याचे प्रमाण वाढत असल्याने कामगिरी पार पडणे एक आव्हान ठरत आहे. यासाठी नागरिकांनी समोर येऊन तक्रार करणे गरजेचे आहे.