शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

गिट्टी खदानवर महसूल विभागाची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:18 IST

वर्धा शहरालगतच्या येळाकेळी शिवारातील गिट्टी खदानवर वर्र्ध्याचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी शनिवारी सुटीच्या दिवशी धाड टाकून कागदपत्राची मागणी केली. बहूतांश खदानधारकाकडे कागदपत्रच नसल्याने त्यांच्या विरुध्द कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देकागदपत्राचा अभाव : कारवाई करण्याची तंबी

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : वर्धा शहरालगतच्या येळाकेळी शिवारातील गिट्टी खदानवर वर्र्ध्याचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी शनिवारी सुटीच्या दिवशी धाड टाकून कागदपत्राची मागणी केली. बहूतांश खदानधारकाकडे कागदपत्रच नसल्याने त्यांच्या विरुध्द कारवाई करण्यात आली. यामुळे खदानधारकांचे धाबे दणाणले आहे.जिल्ह्यातील सर्वाधिक गिट्टी खदानी आणि क्रेशर येळाकेळी शिवारात आहे. मात्र तेथे सुरू असलेल्या १०० च्या जवळपास क्रेशर मशीन चालकांनी परवान्याचे नूतनीकरण केले नाही, अशी तक्रार उपविभागीय अधिकारी दिघे यांना प्राप्त झाली होती. त्या तक्रारीची दखल घेत त्यांनी सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनोने आणि इतर महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन खदानीवर धडक दिली. यावेळी सर्वांकडे कागदपत्रांची मागणी केली. काही खदानधारकांनी उपलब्ध कागदपत्रे दाखविली. मात्र, सहा गिट्टी खदानधारकांकडे फक्त परवाने असल्याचे दिसून आले. बºयाच गिट्टी खदानचालकांनी कागदपत्रे सोमवारी कार्यालयात आणून सादर करु, असे सांगितले. तहसीलदार महेंद्र सोनोने यांनी यावेळी गिट्टी खदानधारकांना त्यांच्याकडे असलेली रॉयल्टी पुस्तके, विद्युत बिलाची पावती तसेच टॅक्सच्या पावत्या सादर कराव्यात, असे बजाविले. जे खदानधारक विहित मुदतीत कागदपत्रे सादर करणार नाहीत, त्यांचे क्रेशर सीलबंद करण्यात येईल, तसेच सील उघडून कारभार करण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्याविरूद्ध पोलीस कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी यावेळी दिली. येळाकेळी येथे उपविभागीय अधिकाऱ्यांनी मारलेल्या अचानक धाडीमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. अधिकाऱ्यांनी ख दानधारकांना कागदपत्र सादर करण्याच्या सूचना केल्यानंतरही मुदतीत कागदपत्रे सादर केले नाही तर त्यांच्याविरूद्ध कारवाई करणार असल्याचे तहसीलदार महेंद्र सोनोने यांनी सांगितले. सुटीच्या दिवशीही अधिकाऱ्यांनी खदानीवर धाड टाकून कागपत्राची तपासणी केल्याने सारेच आता सजग झाले आहे.