शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाचा २०३ हेक्टरवरील पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 00:05 IST

यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिला. परंतु, त्यानंतर झालेला पाऊस उभ्या पिकांसाठी नवसंजीवनीच ठरला. शेतकऱ्यांनीही पिकांची योग्य निगा राखल्याने पिकांची वाढही बºयापैकी झाली. सध्या सोयाबीन मळणीच्या कामाला शेतकºयांकडून प्राधान्य दिले जात आहे.

ठळक मुद्देसोयाबीनचे सर्वाधिक नुकसान : अहवाल शासन दरबारी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चांगलीच अडचण वाढविली आहे. मागील दहा दिवसांत थांबून थांबून झालेल्या पावसाचा २०३.१५ हेक्टरवरील पिकांना चांगलाच फटका बसला आहे. तशी नोंदही जिल्हा प्रशासनाने घेतली असून झालेल्या नुकसानीबाबतचा प्राथमिक अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे.यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिला. परंतु, त्यानंतर झालेला पाऊस उभ्या पिकांसाठी नवसंजीवनीच ठरला. शेतकऱ्यांनीही पिकांची योग्य निगा राखल्याने पिकांची वाढही बºयापैकी झाली. सध्या सोयाबीन मळणीच्या कामाला शेतकºयांकडून प्राधान्य दिले जात आहे. असे असले तरी मागील दहा दिवसांत वर्धा जिल्ह्यात थांबून थांबून झालेल्या परतीच्या पावसामुळे तूर, कापूस व सोयाबीन या पिकांचे चांगलेच नुकसान झाले आहे. सदर परतीच्या पावसामुळे २७.६५ हेक्टर वरील कपाशी, २ हेक्टरवरील तूर तर १२८.५० हेक्टरवरील सोयाबीन पिकाचे ३३ टक्केच्या आत नुकसान झाले आहे. तर १७ हेक्टरवरील कपाशी, २५.८० हेक्टरवरील सोयाबीन पिकाचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. एकूणच परतीच्या पावसाने वर्धा जिल्ह्यातील शेतकºयांचे कंबर्डे मोडले असून हवालदील झालेल्या शेतकºयांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे.सेलू तालुक्यात सर्वाधिक शेतकºयांचे नुकसानजिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविलेल्या प्राथमिक अहवालानुसार परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील एकूण ३१० शेतकºयांचे नुकसान झाले आहे. इतकेच नव्हे तर वर्धा तालुक्यातील ७१, सेलू तालुक्यातील १८०, देवळी तालुक्यातील १०, आर्वी व हिंगणघाट तालुक्यातील प्रत्येकी एक तर समुद्रपूर तालुक्यातील ४७ शेतकºयांचे नुकसान झाल्याचेही या अहवालात नमुद करण्यात आले आहे.एकूण ४३ गावे बाधितपरतीच्या पावसाचा जिल्ह्यातील एकूण ४३ गावांना फटका बसला आहे. यात वर्धा तालुक्यातील सात, सेलू तालुक्यातील सात, देवळी तालुक्यातील चार, आर्वी तालुक्यातील एक, हिंगणघाट तालुक्यातील एक तर समुद्रपूर तालुक्यातील २३ गावांचा समावेश आहे.