शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
8
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
9
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
10
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
11
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
12
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
13
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
14
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
15
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
16
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
17
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
18
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
19
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
20
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?

समन्वय व संवादातून ग्राहकांच्या समस्या सोडवा

By admin | Updated: September 21, 2015 01:59 IST

ग्राहकांच्या हिताचे, समस्यांचे निराकरण समन्वय आणि संवादामधून तात्काळ करण्यात यावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी केले.

संजय भागवत : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठकवर्धा : ग्राहकांच्या हिताचे, समस्यांचे निराकरण समन्वय आणि संवादामधून तात्काळ करण्यात यावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी केले. भागवत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात पार पडली. बैठकीला ज्ञानेश्वर ढगे, सुरेश ठाकरे, अ‍ॅड. संध्या पुरेकर, किशोर मुटे, अजय भोयर, विलास कांबळे, श्याम अमनेरकर, डॉ. ना. ना. बेहरे, प्रणव जोशी, संजय बाळबुधे यांच्यासह वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता शंकर कांबळे उपस्थित होते. बैठकीला सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकार यांनी इतिवृत्ताचे वाचन केले. त्यावर सर्व सदस्यांनी विविध विषयांवर त्यांची मते मांडली. महापारेषण संबंधातील विविध प्रश्नांवर अधीक्षक अभियंता यांनी अशासकीय सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देवून करावयाच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने विभागातील अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले.जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी विभागातील डॉक्टरांच्या रिक्त पदांबाबत माहिती देऊन पुढील काळात या दिशेने कार्यवाही होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने मागील कार्यकाळात केलेल्या कार्यवाहीबाबत सभासदांना अवगत केले. कृषी विभागाशी संबंधित विषयावर पुढील सभेत सादरीकरण करण्यात येणार आहे. दरमहा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक घेण्याचेही निर्देश अपर जिल्हाधिकारी यांनी दिले. सर्वच विभाग प्रमुखांनी चर्चेस आलेल्या मुद्यांवर अनुपालन अहवाल सादर करावा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी दिले. वर्धा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद ग्राहकांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करून समन्वयातून तोडगा काढण्याचे व्यासपीठ असल्याने जिल्ह्यातील पोलीस, जिल्हा परिषद, अन्न व औषध प्रशासन विभाग, दूरसंचार, परिवहन विभाग व जिल्हा माहिती कार्यालयातील कार्यालयीन प्रमुखांचा समावेश आहे. एकूण २७ अशासकीय सदस्यांची नियुक्ती पूर्ण करण्यात आली आहे. आभार जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवाई यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)