शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण परिपत्रकाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:40 IST

उच्च न्यायालयाच्या निर्देशाचा व निकालांचा हवाला देऊन, विद्यापीठ अनुदान आयोग, मानव संसाधन मंत्रालयाने यापूर्वीचे मागासवर्गीय आरक्षणांसाठी असलेले २०० पॉर्इंटचे रोस्टर रद्द केलेले आहे. रोस्टरच्या या परिपत्रकाची महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रा. दिवाकर गमे यांच्या नेतृत्वात होळी करीत जाहीर निषेध नोंदविला.

ठळक मुद्देमहात्मा फुले समता परिषदेतर्फे निषेध : केंद्र शासनाला पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उच्च न्यायालयाच्या निर्देशाचा व निकालांचा हवाला देऊन, विद्यापीठ अनुदान आयोग, मानव संसाधन मंत्रालयाने यापूर्वीचे मागासवर्गीय आरक्षणांसाठी असलेले २०० पॉर्इंटचे रोस्टर रद्द केलेले आहे. रोस्टरच्या या परिपत्रकाची महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रा. दिवाकर गमे यांच्या नेतृत्वात होळी करीत जाहीर निषेध नोंदविला. केंद्र शासनाला निवेदन पाठविण्यात आले.केंद्र शासनाने नव्या १३ पॉर्इंट रोस्टर अनुसारच केंद्रीय विद्यापीठांमधील सुमारे ६ हजार पदांसाठी भरती करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू केलेली आहे. यामध्ये केंद्र सरकारने व त्यांच्या अधिनस्थ विद्यापीठ अनुदान आयोगाने, आरक्षण बिंदूनामावलीसाठी स्वत:च जाहीर केलेल्या २००६ च्या आरक्षण मार्गदर्शक तत्त्वांचा भंग करून तसेच २०० पॉर्इंट आरक्षण बिंदूनामावली आणि विद्यापीठाला एक घटक म्हणून मान्य असलेली आरक्षणप्रणाली रद्द केली. त्याऐवजी विद्यापीठातील प्रत्येक विभाग आणि त्यातील प्रत्येक विषयाला स्वातंत्र्य विभाग मानून, १३ पॉर्इंट रोस्टर लागू करण्याचे निर्देश दिले.हे ओबीसीसहित मागासवर्गीयांचे विद्यापीठ व उच्च शिक्षण विभागातील प्राध्यापक संवर्गातील आरक्षणच मागल्या दाराने रद्द करण्याचा कुटील डाव आहे. एवढेच नव्हे, तर या बिंदूनामावली व रोस्टरविषयी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने साभरवाल प्रकरणासहित जे विविध निकाल दिलेले आहे, त्यातील मार्गदर्शक तत्त्वांचा आणि संविधानातील आरक्षणाच्या अधिकाराचा भंग केलेला आहे.सरकारने न्यायालयात या संदर्भातील निकालांचा उल्लेख टाळून, आरक्षणाची बाजू कमकुवत ठेवल्यामुळे ओबीसी व मागासवर्गीय आरक्षणाच्या विरोधातील निकालाला सामोरे जावे लागले. ओबीसी व मागासवर्गीयांना उच्च शिक्षणातील प्राध्यापकांच्या नोकऱ्यांपासून वंचित करणाऱ्या या १३ पॉर्इंट आरक्षण बिंदू नामावली रोस्टरचा या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अंमलबजावणी पत्राची जाहीर होळी करून महात्मा फुले समता परिषद जाहीर निषेध केला. १३ पॉर्इंट रोस्टरला मागे घेण्यासाठी केंद्राची अधिसूचना जाहीर करून, जुने २०० पॉर्इंट रोस्टर व संपूर्ण विद्यापीठ हेच एक घटक मानून आरक्षण लावावे, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेने केली आहे. उपजिल्हाधिकारी उत्तम दिघे यांच्यामार्फत मानव संसाधन मंत्री यांना निवेदन महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रा. दिवाकर गमे व पदाधिकाºयांनी दिले. या आरक्षण परिपत्रकांची होळी करण्यात आली.विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावरील विषयावर जागांची स्थिती पाहता, केवळ दोन किंवा तीन जागा पद भरतीसाठी असतात. त्यामुळे ओबीसींना यातून आरक्षण मिळणे जवळपास दुरापास्त झाले आहे. त्यातच एससीसाठी सातव्या स्थानावर आरक्षण दिले आहे. तर एस.टी. उमेदवाराला १४ व्या स्थानावर ठेवलेले आहे. एवढ्या प्रमाणात विद्यापीठात व महाविद्यालयात, शाखा व विषयावर जागाच निघत नसल्यामुळे, ओबीसींसह मागासवर्गीयांचे आरक्षण हे केवळ कागदावरच राहणार आहे.

टॅग्स :reservationआरक्षण