शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

मूलनायक मूर्ती व मानस्तंभाची प्रतिष्ठा सोहळा

By admin | Updated: February 18, 2015 01:55 IST

जिनाभिषेक, मोक्षविधी, विश्वशांतीहवन, मोक्षविधी, कैलाश पर्वतावर सूर्यदेवांच्या हस्ते दीप प्रज्वलन, गुरूपूजन, गजराज मिरवणूक, चांदीच्या रथात विराजमान झालेल्या मूलनायक ...

पुलगाव : जिनाभिषेक, मोक्षविधी, विश्वशांतीहवन, मोक्षविधी, कैलाश पर्वतावर सूर्यदेवांच्या हस्ते दीप प्रज्वलन, गुरूपूजन, गजराज मिरवणूक, चांदीच्या रथात विराजमान झालेल्या मूलनायक आदीनाथ स्वामींच्या मूर्तीची असंख्य भाविकांच्या उपस्थितीत शोभायात्रा निघाली होती. यानंतर मोक्षकल्याणक विधान संपन्न होऊन विजयगोपाल येथील पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवाचा समारोप करण्यात आला.अतिशयक्षेत्र विजयगोपाल येथील जैन मंदिरात आचार्य विमलसागर महाराजाचे आशिर्वादाने विशाल जिनालयाचे काम करून लाल पाषाणाची भगवान पार्श्वनाथांची मूर्ती, २४ तीर्थंकरांच्या वेदी व महातिर्थराज सन्नेदारीखरजींची सुंदर प्रतिकृती असे जैन मंदिर याच वर्षात निर्माण करण्याचा संकल्प केला. येथे संत क्षेत्राचा अधिक विकास करण्याचा संकल्प मुनीश्री सुवीरसागरजी महाराज यांनी समारोपीय गुरूवचनामृतातून व्यक्त केले. पंचकल्याणक महोत्सवात ज्ञानकल्याणक प्रसंगी आकर्षक असे चोवीस तीर्थकरांचे समवशरण तयार करण्यात आले. केवलज्ञानविधी दीक्षाकल्याणक, दिव्यध्वनी ज्ञानकल्याणक पूजन होवून रत्नवृष्टी करण्यात आली. शोभायात्रा, आरती, शास्त्रपूजन, महामूनी आदिनाथांचा आहार व भाविकांची प्रश्नोत्तरी झाली. मंगळवारी सकाळी जिनाभिषेक होवून मोक्षकल्याणकाचा आरंभ झाला. आकर्षक व्यासपीठावर कैलाश पर्वत तयार करून मुनीश्री सुविरसागरजींनी अग्नीमंत्र टाकून सुर्यदेवांच्या उपस्थितीत मोक्षकल्याण पुजन केले. विश्वशांतीहवन व महाराजांचे प्रवचन झाल्यानंतर भगवान आदीनाथस्वामींची प्रतिमा चांदीच्या रथात विराजमान करण्यात आली. मंगल वाद्यवृंदाच्या स्वरात महोत्सव स्थळापासून जैन मंदिरापर्यंत मिरवणूक काढली. टिकमगढ येथील संजय साजन व कलावंतानी साथ केली. पाषाणमूर्तीला वेदीशुद्धी, मंत्रशुद्धी करून देवत्वाकडे नेण्याच्या पंचकल्याणक महोत्सवाच्या समारोपात भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी खा.रामदास तडस यांनी मुनीश्रीचे आशीर्वाद घेतले. आपणा सर्वांच्या सहकार्याने या क्षेत्रातील लोकांची सेवा करून जनसेवा हीच ईश्वरसेवा होय, असे सांगून मुनीश्रींचे आशिर्वचन जनमाणसापर्यंत पोहचवणार असल्याचे तडस यांनी बोलताना सांगितले. याप्रसंगी माजी जि.प. सदस्य दिलीप अग्रवाल, डॉ. विजय राऊत यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. या महोत्सवाला विदर्भातील समाजबांधव उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)