शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

बेकायदेशीर गर्भलिंग निदान कळवा अन् एक लाख रुपयांचे बक्षीस मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 17:51 IST

टोल फ्री क्रमांक जारी: तक्रार करा, गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर होणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : प्रसूतिपूर्व निदान तंत्राचा वापर करून बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान करणे, गर्भपात करणे शिक्षेस पात्र आहे; परंतु त्यानंतरही लपून-छपून गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्यात येत आहे. यावर आळा घालण्यासाठी बेकायदेशीर गर्भलिंग निदानाची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने टोल फ्री क्रमांक जारी केला असून, संबंधित डॉक्टर, रुग्णालयाची तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सामान्य रुग्णालय येथे पीसीपीएनडीटीनुसार बेटी बचाव बेटी पढाओ मोहिमेंतर्गत जिल्ह्यामध्ये पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. खबरी योजनेंतर्गत गर्भलिंग निदान करुन गर्भपात करणाऱ्याची माहिती देणाऱ्या व्यक्तीस सदर प्रकरण न्यायालयात दाखल केल्यानंतर १ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली.

समाजात अजूनही भ्रूणहत्या करणाऱ्या अमानवी प्रवृत्तीची कमी नाही. मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत कमी होत आहे; परंतु त्यानंतर सोनोग्राफी केंद्रात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ चे उल्लंघन करण्यात येत आहे. त्यामुळे असे कृत्य करण्याची जाहिरात करणाऱ्या व्यक्ती, पुस्तके, प्रकाशने, संपादक, वितरक आदींची माहिती आरोग्य विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८०० २३३ ४४७५ वर नागरिकांनी नोंदवावी. या बाबीची खातरजमा झाल्यावर संबंधित सोनोग्राफी केंद्रावर व्यक्तीवर न्यायालयीन प्रकरण दाखल केल्यावर माहिती देणाऱ्या व्यक्तीस एक लाख रुपये इतकी रक्कम बक्षीस म्हणून शासनातर्फे जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कुठे असा प्रकार घडत असल्यास कळवावे असे आवाहन केले आहे.

गर्भलिंग निवड कशी करतात?गेल्या काही वर्षांत गर्भातील लिंग जाणून घेण्यासाठी सर्वांत जास्त वापरले जाणारे तंत्रज्ञान म्हणजे अल्ट्रासाउंड सोनोग्राफी. १९८० नंतर सोनोग्राफीचे तंत्रज्ञान सर्वदूर पसरले. परिणामी, गर्भलिंग निदानात वाढ झाली आणि मुलींची संख्या झपाट्याने खालावू लागली.

कोडवर्ड; पेढा की जिलेबी?

  • पोटातील गर्भाचे लिंग जाणून घेणे आणि जर ती मुलगी असेल तर गर्भपात करणे म्हणजे गर्भलिंग निवड आहे.
  • गर्भात मुलगा असल्यास पेढा आणि मुलगी असल्यास जिलेबी, असे कोडवर्ड त्यासाठी वापरण्यात येतात; तसेच काही वेळा प्रीस्क्रिप्शनवर विशिष्ट अशी खूण केली जाते. लपून-छपून हे प्रकार सर्रासपणे केले जातात. त्यावर आता शासनाने करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.

पहिल्या गुन्ह्यासाठी ३ वर्षांची शिक्षा 

  • गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व तंत्रज्ञान हा कायदा गर्भधारणेच्या व प्रसूतीच्या आधी गर्भलिंग निवडीला आळा घालतो. १९९४ मध्ये हा कायदा अस्तित्वात आला. २००३ मध्ये त्यात सुधारणा झाल्या.
  • गर्भाचे लिंग जाणून घेण्यासाठी सोनोग्राफीसारख्या तंत्रज्ञानाच्या वापरावर नियंत्रणाचे काम हा कायदा करतो. काही वैद्यकीय कारणे वगळता, गभर्भाचे लिंग माहीत करून घेणे बेकायदेशीर आहे
टॅग्स :Female Foeticideस्त्रीभ्रूणहत्याwardha-acवर्धा